अर्धापूर सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध; चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीकडे लागले लक्ष
अर्धापूर, नांदेड-
सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्वाचन अधिकारी एस.एस.जळके, सहायक सखाराम पवार यांनी केली आहे.
अर्धापूर सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 34 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 21 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिका-यांनी केली आहे. संचालक म्हणून धर्मराज देशमुख, ओमप्रकाश पत्रे, सोनाजी साखरे, ॲड.किशोर देशमुख, प्रवीण देशमुख, रमेश मेटकर, जीवनाजी लंगडे, प्रमोद मुळे, शंकराव वापटकर, रशिवोद्यीन नसीरुद्यीन,
वामनराव जोगदंड, लक्ष्मीबाई भालेराव, छायाबाई डाहाळे आदींची बिनविरोध निवड झाली आहे.
चार महीन्यापुर्वी नगरपंचायत निवडणूक अतितटीची झाली होती.अर्धापूर सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार याकडे बऱ्याच मंडळीचे लक्ष लागले होते.तर काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश्वर शेटे, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, भाजपा गटनेते बाबुराव लंगडे, नगरसेवक प्रतिनिधी प्रल्हाद माटे आदी राजकीय मडळींनी एकत्र येऊन सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पाडली तसेच सेवा सहकारी सोसायटीची चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड बिनविरोध होते की निवडणूक लागते याकडे राजकीय मंडळीचे लक्ष लागले आहे.
तर आगामी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्याने या निवडणुकीत पुन्हा आमने सामने होणार की बिनविरोध निवडणूका होतील याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.