नांदेडच्या ‘दि क्लॉथ मर्चंटस असोसिएशन’ची निवडणूक बिनविरोध; अध्यक्षपदी माळवतकर, सचिवपदी गंगमवार तर कोषाध्यक्षपदी पेंटलवार

645

नांदेड –

नांदेडच्या कापड व्यापाऱ्यांची महत्त्वाची संघटना म्हणून मानल्या जाणाऱ्या ‘दि क्लॉथ मर्चंट वेल्फेअर असोसिएशन’ची निवडणूक बिनविरोधपणे पार पडली. संघटनेच्या अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा लक्ष्मीकांत माळवदकर यांच्या गळ्यात घालण्यात आली तर सचिव पदी गणेश गंगमवार तर कोषाध्यक्ष पदी रवींद्र पेंटलवार यांची निवड करण्यात आली.

यावेळी सभासदांची सर्वानुमते कार्यकारणी जाहीर करण्यात आली. पुढील पाच वर्ष या कार्यकारिणी मंडळाकडे संघटनेचा कारभार राहणार आहे. दरम्यान, कापड व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याच्या भावना कार्यकारिणी मंडळातील पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी व्यक्त केल्या. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संघटनेची सूत्रे हाती घेण्यासाठी मोठी रस्सीखेच होईल असे अनेकांना वाटत होते. परंतु, सभासदांनी एकत्र येऊन घेतलेल्या बैठकीत ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये लक्ष्मीकांत माळवदकर (अध्यक्ष), केशव मालेवार (उपाध्यक्ष), गणेश गंगमवार (सचिव) कन्हैयालाल धनवाणी (सहसचिव) रवींद्र पेंटलवार (कोषाध्यक्ष) आहेत. तर सदस्य म्हणून सतीश राखेवार, युनूसभाई, एकनाथ वट्टमवार, हरीश वापरानी, सौ.पुष्पा लालवाणी, सौ. प्रेमला निलावार, किशोर राखेवार, खेमचंद दायमा, लक्ष्मीकांत मुक्तावार, दीपक रंगनानी, रमेश सुत्रावे, पंकज भायेकर, महेशकुमार आहूजा, शैलेश तोष्णीवाल, प्रवीण काळे यांचा समावेश आहे. माळवदकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संघटनेचे पदाधिकारी व सभासदांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.