नांदेड येथील वैद्यकीय अध्यापकांचा एल्गार; 14 मार्च पासून रूग्णसेवा बंद

476
नांदेड –

नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील अध्यापकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी परत एकदा एल्गार केला असून दिनांक 14 मार्च 2022 पासून अत्यावश्यक सेवा व कोविड-19 रूग्ण सेवा वगळता इतर कामावर बहिष्कार टाकण्याचे ठरले असल्याचे संघटनेचे सचिव डॉ. मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले.

मागील आठवड्यापासून सुरू असलेले आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आले असून शासनाकडून कुठलीही ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे आणि विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा तारांकित प्रश्न उपस्थित केला असता वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडून कुठलाही निर्णय त्यांनी जाहीर न केल्यामुळे आता हे आंदोलन तीव्र होत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष डॉ.संजय मोरे यांनी सांगितले.

आंदोलनांमध्ये महाविद्यालयातील सर्व अध्यापक सहभागी होणार असून सर्वांनी 14 मार्च पासून कामावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे त्याप्रमाणे रुग्णांची गैरसोय होईल त्याबद्दल खेद व्यक्त केला असून शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला तर हे आंदोलन मागे घेण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व महाविद्यालयातील डॉ,जे.बी. देशमुख, डॉ.हेमंत गोडबोले, डॉ.पंकज कदम डॉ.किशोर राठोड, डॉ.मुंगळ, डॉ.समीर, डॉ.तोटावाड ,डॉ.सुधा, डॉ. वैशाली, डॉ.अनुजा देशमुख, डॉ.कर्डिले, डॉ.भगत मॅडम, डॉ.नागरिक, डॉ.मुधोळकर ,डॉ.देगावकर, डॉ.केळकर, डॉ. अरविंद चव्हाण, डॉ.तांबे, डॉ.तांबोळी हे करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.