नांदेडमद्धे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची सुसाईड नोट लिहून वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या; प्रेमप्रकरणातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

6,951

नांदेड-

नांदेडच्या विष्णुपुरी येथील श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीने वसतिगृहातील रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमप्रकरणातून होणाऱ्या मानसिक तणावातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सूत्रांकडून समजते. घटनास्थळी पोलिसांच्या हाती एक सुसाईड नोट लागली असून, या चिठ्ठीत तिचा वाशिमचा प्रियकर आत्महत्येला कसा जबाबदार आहे? याचा उल्लेख असल्याची माहिती समोर येत आहे.ही घटना बुधवारी (दि.21) मध्यरात्री उघडकीस आली.

गीता कल्याण कदम, वय 22 रा. उस्मानाबाद असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गीता ही विष्णुपुरी येथील श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात बी.ई. तृतीय वर्षात शिकत होती. ती महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होती. काल दि.21 मध्यरात्री वसतिगृहातील खोली आतून बंद करून घेऊन गीताने खिडकीच्या पडद्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती तात्काळ नांदेड ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड व अन्य पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. तिने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे या चिठ्ठीतील माहितीतून समोर येत आहे. यामद्धे आत्महत्येला कोण जबाबदार आहे? याबाबत सविस्तर माहिती लिहून ठेवली आहे. त्यातील मजकुरामध्ये तिचाच वाशिमचा मित्र हा कशाप्रकारे जबाबदार आहे याचा उल्लेख असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

“माझ्या सारखा मृत्यू इतर मुलींना मिळू नये, यासाठी मी आत्महत्या करत आहे” तसेच महिला आयोगाने सुद्धा माझ्या मृत्यूची चौकशी करावी, असे त्या चिठ्ठीत नमूद असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, तरुणीचे नातेवाईक नांदेडला पोहचले असून बातमी लिहिपर्यंत या आत्महत्या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.