वीर बाल दिनानिमित्त आज व उद्या कार्यक्रम; पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते वीर बालदिवस व नांदेड महोत्सवाचे उद्घाटन

348

नांदेड –

राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते वीर बाल दिवस व नांदेड महोत्सवाचे उद्घाटन रविवार 25 डिसेंबर 2022 रोजी गुरुग्रंथ साहिब भवन, यात्री निवास परिसर नांदेड येथे सकाळी 10 वा. होणार आहे.

ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समारंभास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार भिमराव केराम, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार डॉ.तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापुरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

याचबरोबर माजी पोलीस महासंचालक डॉ.परविंदरसिंघ पसरीचा, पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, पर्यटन संचलनालयाचे संचालक डॉ.बी.एन.पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी एस.जी.माळवदे यांची उपस्थिती राहणार आहे.

वीर बाल दिवस व नांदेड महोत्सवात रविवार 25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वा. या कालावधीत गुरुग्रंथ साहिब भवन, यात्री निवास परिसर, नांदेड येथे चर्चासत्र. सायं. 5.30 ते 6.30 वाजेपर्यंत मार्शल आर्टस्, रात्री 8.30 वा. गुरुग्रंथ साहिब भवन, यात्री निवास परिसर नांदेड येथे शबद किर्तनाचे आयोजन केले आहे.

सोमवार 26 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8 ते 11 वा. महात्मा फुले पुतळ्यापासून ते गुरुग्रंथ साहिब भवन यात्री निवास परिसर नांदेड या मार्गावर शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी. दुपारी 12.15 ते 2.30 या कालावधीत गुरुग्रंथ साहिब भवन यात्री निवास परिसर नांदेड येथे निबंध, वक्तृत्व स्पर्धा व कविता वाचन. सायं. 5.30 ते 6.30 पर्यंत गोदावरी नदीकाठी (नगीनाघाट) येथे मार्शल आर्टस तर रात्री 8.30 वा. गुरूग्रंथ साहिब भवन यात्री निवास परिसरात शबद किर्तनाचे आयोजन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.