खळबळजनक ! निधीने धर्मांतराला विरोध केला अन् सुफीयानने तिला चौथ्या मजल्यावरून फेकले; गुन्हा दाखल

2,640

NEWS HOUR नेटवर्क –

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये निधी गुप्ता या तरुणीची हत्या करण्यात आली आहे.धर्मांतर करून लग्न करण्यास नकार दिल्याने तिला आपला जीव गमवावा लागला होता. सुफियानवर निधीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याचा आरोप आहे. ही घटना मंगळवार दि.१५ ला घडली आहे.सुफियान अद्याप फरार आहे.


आफताबने श्रद्धा वालकरचे तुकडे केल्याची घटना घडल्याने संपूर्ण देश हादरला असताना ही घटना समोर आली आहे. निधीच्या आईचे म्हणणे आहे की, सुफियान व्हिडिओ बनवून तिच्या मुलीवर अत्याचार करत होता. याबाबत तिने सुफियानच्या आईकडे तक्रार केली असता तिने त्या दोघांचे लग्न लावून देण्यास सांगितले. मिळालेल्या वृत्तानुसार, पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून सुफियानवर खून आणि धर्मांतराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दक्षिण लखनऊमधील दुबग्गा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. निधीचे कुटुंब दुडा कॉलनीतील ब्लॉक ४१ येथे राहते. हायस्कूलपर्यंत शिकलेली निधी ब्युटी पार्लरमध्ये काम करायला शिकत होती. सुफियानही त्याच्या कुटुंबासोबत लगतच्या ब्लॉक ४० मध्ये राहतो. तो निधीच्या मागे बराच वेळ होता. तो धर्मांतर आणि लग्नासाठी दबाव टाकत होता, असा त्याच्यावर आरोप आहे. त्याच्या लहरीपणाला कंटाळून निधीला तिच्या कुटुंबीयांनी काही काळासाठी तिच्या आजोळी पाठवले होते. मात्र काही दिवसांनी ती परतल्यावर सुफियानचा त्रास पुन्हा सुरू झाला.

सुफियानवर मुलीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. गेल्या १५ दिवसांपासून सुफियान निधीवर अत्याचार करत होता. तो धर्मांतरासाठी दबाव टाकत होता, असा आरोप आहे. याला कंटाळून निधीच्या आईने मंगळवारी भावाला फोन केला. ते सुफियानच्या घरी जात होते. दरम्यान, सुफियानने आधी त्यांना धमकावले आणि नंतर निधीला टेरेसवरून ढकलून दिले. त्यानंतर निधीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने निधीचे डोके फुटले. ही घटना घडल्यानंतर आजूबाजूचे लोक तिच्या मदतीला धावले. दरम्यान, सुफियान घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.