नांदेडच्या पिंपळगाव शिवारात 8 लाखांची बनावट देशी व विदेशी दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; तिघे जण ताब्यात (व्हिडिओ)

3,709

नांदेड –

नांदेड- अर्धापूर रोडवर पिंपळगाव महादेव शिवारात एका चारचाकी स्विफ्ट डिझायनर गाडीतून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने 8 लाख 29 हजार 410 रुपये किंमतीची बनावट व परराज्यात तयार केलेली दारू जप्त केली आहे. ही कारवाई 8 सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या किनवट येथील दुय्यम निरीक्षक कार्यालयाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर या विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पिंपळगाव शिवारात छापा मारला.यावेळी स्विफ्ट डिझायनर गाडीत विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जात असलेली मॅकडॉवेल नंबर 1, इम्पिरीयल ब्लू या विदेशी कंपनीसह देशी दारूचा बनावट साठा तसेच इतर साहित्य आणि परराज्यात निर्मित दारू आढळून आली.

  जप्त करण्यात आलेला देशी व विदेशी मद्याचा साठा

सदर प्रकरणी सूर्यप्रकाश रामराव आत्राम रा.लातूर, शेख रसूल यासीन रा.लातूर व केरबा रामजी पुयड रा.मिनकी, तालुका बिलोली या तिघांना उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून गोवा राज्यात तयार केलेल्या मॅकडॉवेल नं.1 विस्कीच्या 76 हजार 800 रुपये किंमतीच्या 480 सीलबंद बाटल्या, 36 हजार रुपये किंमतीच्या इम्पिरीयल ब्लू या कंपनीच्या 240 सीलबंद बाटल्या व 3360 रुपये किंमतीच्या बनावट देशी दारूच्या बाटल्या तसेच स्विफ्ट डिझायनर कार, मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.याशिवाय बनावट कागदी लेबल, बाटलीचे बुच असा एकुण 8 लाख 29 हजार 410 रुपये किंमतीचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे.यातील आरोपींना आधी तीन दिवसाची एक्साईज कोठडी देण्यात आली त्यानंतर न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कार्यवाही ए.एम.पठाण निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, देगलूर, अनिल एन.पिकले दुय्यम निरीक्षक, किनवट ब विभाग, राजकिरण सोनवणे, दुय्यम निरीक्षक, देगलूर अ विभाग, सौ.ज्योती गुट्टे दुय्यम निरीक्षक, नांदेड अ विभाग, बालाजी पवार, गणेश रेनके, प्रवीण इंगोले, विकास नागमवाड, रावसाहेब बोदमवाड, खतीब खुर्शिद, श्रीनिवास दासरवार, परमेश्‍वर नंदुसेकर, श्रीमती धन्यश्वरी टेंबुर्ने यांनी यशस्वीरित्या पार पडली असून पुढील तपास अनिल एन.पिकले दुय्यम निरीक्षक, किनवट ब विभाग हे करत आहेत.

अतुल कानडे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नांदेड यांनी सर्व जनतेस असे आवाहन केले की, अवैध मद्य निर्मिती, विक्री वाहतूक या बाबत कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल क्र.१८००८३३६३३३ व व्हाटस अप क्र. ८४२२००१९३३ तसेच दूरध्वनी क्र. ०२४६२-२८७६१६ यावर संपर्क करावा.

Leave A Reply

Your email address will not be published.