बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचे निधन
मुंबई –
बाॅलिवुडचे ज्येष्ठ संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचे निधन झाले आहे. त्यांनी 69 व्या वर्षी अखेरचा मंगळवारी रात्री 11 च्या सुमाराच श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते, त्यामुळे त्यांच्यावर जुहूच्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील वर्षी बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण झाली होती.
बप्पी लहरी यांना सोन्याचे दागिने घालणे आणि डोळ्यांवर कायम चश्मा लावणे त्यांना पसंत होते. गळ्यात जाड सोन्याच्या चेन्स, बोटांमध्ये सोन्यांच्या अंगठ्या घालणे त्यांना आवडत होते. अंगावरील दागिन्यांमुळेही त्यांची वेगळी ओळख होती. बप्पी लहरी यांना बाॅलिवुडचा पहिला राॅक स्टार असेही संबोधलं जात होतं.
त्यांचा जन्म 17 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडीमध्ये झाला होता. बप्पी लहरी यांना दोन मुले आहेत. या महिन्यात संगीतविश्वाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. 6 फेब्रुवारी 2022 रोजी गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाले होते. त्यानंतर मंगळवारी गायक बप्पी लहरींचे झाल्याने बाॅलिवूडला मोठा धक्का बसला आहे.
या गाण्यांमुळे पोहचले प्रसिद्धीच्या शिखरावर
1982 मध्ये आलेला चित्रपट मिथुन चक्रवर्ती यांचा चित्रपट ‘डिस्को डान्सर’मुळे बप्पी यांचे करिअर बहरले व ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले.या चित्रपटातील गाण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. ‘नमक हलाल, शराबी, हिम्मतवाला, साहेब, गुरू, घायल आणि रंगबाज’ यासारख्या चित्रपटांना संगीत दिले. 2000 नंतरदेखील चित्रपटांमध्ये ते सक्रिय होते. ‘टॅक्सी नंबर 9211,’ ‘द डर्टी पिक्चर,’ ‘हिम्मतवाला,’ ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ आणि ‘व्हाय चीट इंडिया’ या चित्रपटातील गाण्यांना संगीत दिलं.