अखेर मेस्सीच्या हाताचा ठसा ‘वर्ल्डकप’ वर उमटला; फ्रान्सला पेनल्टी शुटआऊटमद्धे मात देत अर्जेंटिना फुटबॉलचा नवा जगज्जेता ! मेस्सीचे स्वप्न झाले साकार

656

NEWS HOUR नेटवर्क –

तब्बल 144+ मिनिटापर्यंत रंगलेल्या रोमांचकारी सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शुटआऊटवर फ्रान्सचा 4-2 ने पराभव करत तब्बल 36 वर्षांनंतर विश्वचषकावर आपले नाव कोरले. सामन्यात एमबाप्पेने तीन गोल करुन ही त्याला फ्रान्सला विजयी करण्यात अपयश आले.

कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना गत विजेता फ्रान्स व लॅटिन अमेरिकन देश अर्जेंटिना यांच्या दरम्यान खेळला गेला. दोहा येथील लुसेल स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआउटमध्ये बाजी मारत विश्वचषक आपल्या नावे केला.यासह लिओनेल मेस्सी याच्या शानदार कारकिर्दीची अखेर विजयाने झाली.

सामन्यात सुरूवातीपासून आक्रमक खेळी करत गतविजेता फ्रान्सवर दबाव टाकत अर्जेंटिनाने 2-0 ने विजय मिळवला.संपूर्ण सामन्यात मेस्सीने आपल्या खेळीने अक्षरशः फ्रान्सच्या खेळाडूंचा घामठा फोडला.मेस्सीने चाली रचण्यासाठी आपले कसब पणाला लावत संघाला सहाय्य केले. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये फ्रान्सच्या खेळाडूंना गोल न करता आल्यामुळे स्कोर 0-2 असा राहिला.

विजेतेपदाचे दावेदार म्हणून या सामन्यात उतरलेल्या फ्रान्सवर दिग्गज लिओनेल मेस्सी याच्या नेतृत्वातील अर्जेंटिना संघाने सुरुवातीपासून वर्चस्व राखले. पहिल्या वीस मिनिटात फ्रान्स संघ केवळ एकदाच अर्जेंटिनाच्या क्षेत्रात धडक देऊ शकला.20 व्या मिनिटाला फ्रान्सच्या बचावपटूने केलेल्या खेळाचा फायदा उठवत मेस्सीने मिळालेली पेनल्टी सत्कारणी लावत संघाला आघाडीवर नेले.

पहिल्या गोलचा जल्लोष चाहते करत असतानाच मेस्सीने आणखी एक आक्रमण रचले. डाव्या बगलेतून त्याने रचलेल्या आक्रमणाला एंजेल डी मारिया याने गोलच्या स्वरूपात बदलले‌.‌ 36 व्या मिनिटाला झालेल्या या गोलमुळे अर्जेंटिना संघ सामन्यात पुढे गेला.

संघ पिछाडीवर पडलेला असताना, फ्रान्सच्या प्रशिक्षकांना ‌‌‌40 व्या मिनिटालाच आपल्या संघात बदल करावे लागले. संपूर्ण स्पर्धेत चांगले कामगिरी केलेले जिरू व थुरम यांना प्रशिक्षक डीडीअर डेश्चॅप यांनी बाहेर घेतले.अतिरिक्त मिळालेल्या सात मिनिटात दोन्ही संघांनी बचावात्मक खेळावर भर दिला.

दुसऱ्या हाफमध्ये मात्र फ्रान्सचा संघ अतिशय आक्रमक पद्धतीने खेळताना दिसला. सामना एक वेळ अर्जेंटिनाच्या बाजूने गेला आहे असे वाटत असताना स्पर्धेत पाच गोलल झळकावलेला किलीयन एमबाप्पे फ्रान्सच्या मदतीला धावला. 80 व्या मिनिटाला मिळालेली पेनल्टी त्यांनी गोलमध्ये ढकलत पिछाडी भरून काढली. पुढच्याच मिनिटाला त्याने आणखी एक सुरेख गोल करत फ्रान्सला सामन्यात बरोबरी करून दिली. अखेरच्या दहा मिनिटात फ्रान्सच्या संघाने गोल करण्याचे आणखी दोन प्रयत्न केले. मात्र, ते प्रयत्न सफल झाले नाहीत.

अतिरिक्त वेळेस गेलेल्या सामन्यातील पहिला हाफ अर्जेंटिना संघाने गाजवला. त्यांना गोल करण्याच्या दोन संधी मिळाल्या होत्या. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही. अतिरिक्त वेळेतील दुसऱ्या हाफच्या तिसऱ्याच मिनिटाला लिओनेल मेस्सी याने पुन्हा एकदा करामत दाखवत गोल मारत अर्जेंटिनाला विजेतेपदाच्या जवळ आणले. अतिरिक्त वेळ संपण्यासाठी केवळ तीन मिनिटांचा अवधी शिल्लक असताना फ्रान्सला पुन्हा एकदा पेनल्टी बहाल करण्यात आली.एमबाप्पेने पेनल्टी गोलमध्ये बदलत संघाला पुन्हा बरोबरी साधून दिली.

फ्रान्सकडून एमबाप्पेने आजच्या मॅचमध्ये हॅट्रिक केली. किलीयन एमबाप्पेने फ्रान्ससाठी तीन गोल केले. 80 आणि 82 व्या मिनिटाला त्यानं गोल करत फ्रान्सला बरोबरीत आणलं. पुन्हा 118 व्या मिनिटाला तिसरा गोल करत टीमला 3-3 अशा बरोबरीत आणलं. एमबाप्पेचं वय अवघं 23 वर्ष आहे.

अतिरिक्त वेळेतील अखेरचे काही सेकंद शिल्लक असताना अर्जेंटिनाच्या गोल रक्षकाने मीयाने याचा प्रयत्न हाणून पाडत संघाला पराभवापासून वाचवले. त्यामुळे सामना पेनल्टी शूट आउटमध्ये गेला. अर्जेंटिनाने चार तर फ्रान्सला दोनच गोल करता आल्याने अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा विजेतेपद आपल्या नावे केले.

एमबाप्पे ठरला गोल्डन शूजचा मानकरी..

किलीयन एमबाप्पे याला गोल्डन शूजचा मान देऊन गौरवण्यात आले.यासाठी मेस्सी आणि त्याच्यामध्ये रस्सीखेच होती. तर, मेस्सीला गोल्डन बॉल देऊन
गौरविण्यात आले.

मॅच संपल्यावर एमबाप्पे मैदानावर बसून राहिला

फ्रान्सच्या विजयासाठी मैदानावर जवळपास दोन तासांहून अधिक काळ लढणारा एमबाप्पे पेनल्टी शुटआऊटमध्ये संघाला पराभव स्वीकारावा लागल्यानं निराश झालेला दिसून आला.

एकीकडे अर्जेंटिनाचे खेळाडू जल्लोष करत होते. तर, दुसरीकडे एमबाप्पे मैदानावर बसून विचार करत होता.संघासाठी एकाकी लढलेला शिलेदार अखेर संघाचे वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर तिथून उठला. अखेर संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही तरी एमबाप्पे हा गोल्डन शूजचा मानकरी ठरला.

पेनल्टी शूटआऊटमध्ये काय घडले…

फ्रान्सचा पहिला गोल.

अर्जेंटिनाचा पहिला गोल.

फ्रान्सची दुसरी संधी हुकली अर्जेंटिनानं दुसरा गोल केला.

फ्रान्सची तिसरी संधी हुकली.

अर्जेंटिनानं तिसरा गोल केला.

फ्रान्सकडून चौथ्या संधीचं गोलमध्ये रुपांतर अर्जेंटिनाकडून चौथा आणि विजयी गोल.

वर्ल्ड कप विजेते संघ..

ब्राझील – 5 (1958, 1962, 1970, 1994, 2002 )

जर्मनी – 4 (1954, 1974*, 1990, 2014)

इटली – 4 (1934*, 1938, 1982, 2006)

अर्जेंटीना – 3 (1978*, 1986, 2022)

फ्रान्स – 2 (1998*, 2018)

उरुग्वे –  2 (1930*, 1950)

इंग्लंड –  1 (1966*)

स्पेन – 1 (2010)

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.