“शिवसेनेचा सिनेमा येण्यापूर्वीच ट्रेलरमद्धे फ्लॉप” दरेकरांचा राऊत यांच्यावर पलटवार
मुंबई –
शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्रकार परीषद म्हणजे फुसका बार आहे. त्यांनी निव्वळ नौटंकी केली आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले त्यांना मानसोपचाराची गरज असल्याची,’ खोचक टीप्पणी भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केली. राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर लाड यांनी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. यावेळी ते बोलत होते.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा पलटवार
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही राऊत यांच्या पत्रकार परिषदेवरून प्रतिक्रिया दिली. राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे फुसक्याहून फुसका बार असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपमधील साडेतीन लोकांची नावे राऊतांनी घेतली नाही. इव्हेंट करुन काहीतरी माठे करायचे परंतु त्यांचा तो प्लान फसला असल्याचे दरेकरांनी सांगितले.
ते पुढे बोलताना म्हणाले की, कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी करायची असते. सत्ताधाऱ्यांनी कारवाई करायची असते, महाविकास आघाडी सरकार बसलेले आहे. सरकार बसवण्यात सर्वात मोठा रोल संजय राऊतांचा आहे. त्यामुळे संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना सांगितले तर कारवाई होते मग मोहित कंबोज यांच्यावर आरोप करण्यापेक्षा त्यांनी तक्रार केली पाहिजे. परंतु यांना तक्रारीमध्ये जायचे नाही. त्यामुळे शिवसेनेचा सिनेमा येण्यापूर्वीच ट्रेलरमध्ये तो फ्लॉप झाला आहे, असे म्हणत दरेकर यांनी राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.