माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी

पद्मविभूषण खा.शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी पार पडणार अमृतमहोत्सव सोहळा

420

नांदेड –

पद्मविभूषण तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार व राज्यातील अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांचा अमृतमहोत्सव सोहळा दि.14 मे रोजी सायंकाळी 5 वाजता मादसवाड ईस्टेट नमस्कार चौक, म्हाळजा बायपास येथे आयोजित केलेला आहे. या अमृतमहोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झालेली आहे, अशी माहिती अमृतमहोत्सव सोहळा संयोजन समितीचे अध्यक्ष माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर व समितीचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.

खा.शरदचंद्र पवार यांचे आगमन दि.14 मे रोजी सकाळी 9.30 वाजता नांदेड विमानतळावर होईल. त्यानंतर 10 वाजता खा. हेमंत पाटील यांच्या गोदावरी अर्बनच्या नांदेड येथील कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे. दुपारी 12 वाजता वसमत जि.हिंगोली येथे आ.राजू नवघरे यांनी आयोजित केलेल्या सामुहिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. दुपारी 1 वाजता राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या फार्म हाऊसवर राखीव, दुपारी 2 वाजता नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन. 2 ते 5 या वेळेत अभ्यागतांसाठी राखीव वेळ असेल.

सायंकाळी 5 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील शामराव कदम यांच्या पद्मश्री इन्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच सामाजिक न्याय भवनाजवळ भुमिपूजन सोहळा खा.शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते होणार आहे.माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांचा अमृतमहोत्सव सोहळा सायंकाळी 5.30 वाजता मादसवाड इस्टेट नमस्कार चौक म्हाळजा बायपास येथे आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाला खा.शरदचंद्र पवार यांची उपस्थिती असेल. तसेच अमृतमहोत्सव सोहळ्याला माजी खा.केशवराव धोंडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमात आभासी पद्धतीने केंद्र सरकारचे भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी हे सहभाग नोंदविणार आहेत. तसेच नांदेडचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांची विशेष उपस्थिती असणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सार्वजनिक आरोग्य व रोहयो राज्यमंत्री संजय बनसोडे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, एमजीएमचे सचिव अंकुशराव उर्फ बाबुराव कदम यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

हेही वाचा : अर्धापूर तालुक्यातील पार्डी जवळ बस-कंटेनरचा अपघात; अनेक जण जखमी, 10 जखमींना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात केले दाखल

तसेच खा.प्रताप पाटील चिखलीकर, खा.हेमंत पाटील, खा.फौजिया खान, माजी मंत्री सुर्यकांता पाटील, माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, माजी खा.डी.बी.पाटील, डॉ. व्यंकटेश काब्दे, विठ्ठलराव जाधव, शिवाजी माने, सुभाष वानखेडे, महापौर जयश्री पावडे, विधान परिषद सदस्य विक्रम काळे, सतिश चव्हाण, आ. राम पाटील रातोळीकर, आ.बाबादाजी दुर्राणी, आ.बालाजी कल्याणकर, आ.अमर राजूरकर, आ.मोहन हंबर्डे, आ.राजेश पवार, आ.भीमराव पवार, आ.माधवराव जवळगावकर, आ.श्यामसुंदर शिंदे, आ.तुषार राठोड, आ. जितेश अंतापूरकर, आ.राजू नवघरे, माजी मंत्री डी.पी. सावंत, डॉ. माधवराव किन्हाळकर, माजी आ.डॉ.गुरूनाथ कुरूडे, माजी आ.गंगाधर पटणे, किशनराव राठोड, माजी आ.प्रदीप नाईक, माजी आ.वसंतराव चव्हाण, माजी आ.बापूसाहेब गोरठेकर, माजी आ.शंकरअण्णा धोंडगे, माजी आ.गंगाराम ठक्करवाड, माजी आ.नागेश पाटील आष्टीकर, डॉ.डी.आर. देशमुख, पंडीतराव देशमुख, मुगाजीराव जाधव, ईश्‍वराव भोसीकर, सौ. अमिता चव्हाण, भाऊराव पाटील गोजेगावकर, साहेबराव पाटील गोजेगावकर, सुभाष साबणे, अनुसयाताई खेडकर, रोहिदास चव्हाण, ओमप्रकाश पोकर्णा, हनुमंत पाटील बेटमोगरेकर, अविनाश घाटे यांच्यासह लड्डुसिंघ महाजन, गोविंदसिंग तेहरा, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. मोहम्मद खान पठाण, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भगवानराव पाटील आलेगावकर, माजी नगराध्यक्ष मकबुल सलीम, चंद्रकांत पाटील, डॉ.धनाजीराव देशमुख, रमेश देशमुख शिळवणीकर, डॉ.हंसराज वैद्य, यादवराव जाधव, माधवराव पाटील शेळगावकर, आशाताई भिसे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, आनंद बोंढारकर, उमेश मुंडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण हरिहरराव भोसीकर, प्रजासत्ताक पार्टीचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भाजपचे शहराध्यक्ष प्रविण साले, विजय सोनवणे, शिवा नरंगले, ज्ञानेश्‍वर पांगरीकर, मनिष कावळे, मॉन्टीसिंघ जहागीरदार, फेरोज खान लाला, भगवान ढगे आदी जणांची उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमाला कोणत्याही व्यक्तींनी शाल, हार, पुष्पगुच्छ आणू नयेत, अनेक मंत्री उपस्थित असल्यामुळे गैरसोय होवू शकते असे आवाहनही स्वागत समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सर्वांनीच या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी संयोजन समितीचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, संयोजन समितीचे उपाध्यक्ष डॉ.सुनील कदम, डॉ.संजय कदम, बालासाहेब मादसवाड यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला संयोजन समितीचे डॉ.संजय कदम, मकबूल सलीम, माजी सभापती भगवानराव पाटील आलेगावकर, मनपाचे माजी विरोधी पक्षनेता जीवन पाटील घोगरे, युवकचे शहराध्यक्ष रऊफ जमीनदार, शहर उपाध्यक्ष बंटी लांडगे, ग्रामीणचे जिल्हा सरचिटणीस प्रा. डी.बी. जांभरूणकर, युवकचे जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, सुभाष कदम, तातेराव पाटील आलेगावकर, गणेश तादलापूरकर, सय्यद मौला, गंगाधर कवाळे, श्रीधर नागापूरकर, दत्ता पाटील तळणीकर, युनूस खान, राहूल जाधव, शफी उर रहेमान आदी जणांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.