खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून नांदेड जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी 48 कोटी 72 लाखांचा निधी मंजूर

1,040

नांदेड –

खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून नांदेड जिल्ह्यातील अनेक रस्त्याच्या विकासासाठी तब्बल 48 कोटी 72 लाख 56 हजार पर्यंत मंजूर करण्यात आला आहे. या निधीची तरतूद नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.

ग्रामीण भागाला शहरी भागाशी जोडण्यासाठी आणि ग्रामीण भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या त्या भागातील दळणवळणाची साधने अधिक सक्षम झाली पाहिजेत. दळणवळणाची साधने सक्षम करण्याच्या अनुषंगाने रस्ते विकासाची बांधणी होणे अत्यावश्यक आहे. हीच बाब लक्षात घेता खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागाला पक्क्या रस्त्याने जोडण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत नांदेड जिल्ह्यातील विविध रस्ते विकासासाठी तब्बल 48 कोटी 72 लाख 56 हजार रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे.

या कामात नायगाव तालुक्यातील कहाळा -पाटोदा -बरबडा – अंतरगाव – कुंटूर भाग एक अंतर्गत कुंटूर सालेगाव या रस्त्याच्या विकासासाठी सात कोटी रुपये, कंधार तालुक्यातील पेनुर- शेवडी -सोनखेड -कलंबर – बारूळ या रस्त्याचे रुंदीकरण आणि पुलासह बांधकामासाठी सात कोटी पन्नास लाख, अहमदपूर – घोटगा – कुरुळा- कंधार- बारूळ- गडगा या रस्त्याच्या विकासासाठी सोळा कोटी रुपये, नायगाव तालुक्यातील मांडणी -काहळा – बरबडा – अंतरगाव – रुई – कुंटूर – सालेगाव – डोंगरगाव या रस्त्याचे विकासासाठी 11 कोटी रुपये, कंधार तालुक्यातील जिल्हा सीमा कुरुळा- पोखरणी – गवळण -आंबुलगा – बोरी बुद्रुक या रस्त्यासाठी सात कोटी रुपये आणि देगलूर तालुक्यातील हाणेगाव- कर्नाटक राज्य सीमा- रस्त्याची अर्दन शोल्डरसह दुपदरीकरणासाठी 22 कोटी 56 लाख असा एकूण 48 कोटी 72 लाख 56 हजार रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे.

या निधीची तरतूद नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली असून ही कामे लवकरच सुरू होतील असा विश्वासही खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे. ग्रामीण भागाला शहरीकरणाशी जोडून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे सरकार काम करते आहे. शिवाय मोदी सरकारच्या नेतृत्वाखालीही ग्रामीण भागाच्या विकासाचे अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. आगामी काळात नांदेड जिल्ह्यातील अन्य रस्त्याच्या विकास कामासाठी निधी मिळविला जाईल, असा विश्वास खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.