नांदेड पोलीस दलातील महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गंगुताईचे वयाच्या 50 व्या वर्षी मैदानी खेळात तिहेरी यश

736

नांदेड –

नांदेड जिल्हा पोलीस दलातील महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने केरळ राज्यातील त्रिवेंद्रम येथे आयोजित मास्टर्स गेम्स फेडेरेशन ऑल इंडिया यांच्या वतीने आयोजित खेळांमध्ये गोळाफेक, थाळीफेक आणि 100 मीटर धावणे या स्पर्धांमध्ये तिहेरी यश मिळवले आहे. या यशाबद्दल पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे कौतुक केले आहे.

नांदेड जिल्हा पोलीस दलातील व पोलीस ठाणे इस्लापूर येथे कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक पोलीस उप निरीक्षक गंगुताई पोशट्टी नरतावार उर्फ गंगुताई नागोराव जिंदमवार या 50 वर्षीय महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने केरळ राज्यातील त्रिवेंद्रम येथे पार पडलेल्या मैदानी स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धांमध्ये त्यांनी गोळाफेक स्पर्धेत तृतीय आणि थाळीफेकमध्ये द्वितीय क्रमांक तसेच 100 मीटर धावणे या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

त्यांच्या या यशाबद्दल पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे नांदेड, श्रीमती डॉ.अश्विनी जगताप, पोलीस उप अधीक्षक मुख्यालय नांदेड, द्वारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड, शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी, रघुनाथ शेवाळे, सपोनि पोलीस स्टेशन इस्लापुर यांनी अभिनंदन केले आहे. गंगुताई नरतावार यांनी पोलीस दलात काम सुरु केल्यापासून आजवर अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश संपादन केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.