गानसम्राज्ञी, भारतरत्न स्व.लता मंगेशकर व स्व. सिंधुताई सपकाळ यांना सुप्रभातच्या वतीने सांगीतिक श्रद्धांजली संपन्न

335

दादाराव आगलावे,

मुखेड, नांदेड –

सुप्रभात मित्र मंडळच्या वतीने दि.११ रोजी शहरातील कोत्तावार ऑईल मील येथे सांगीतिक कार्यक्रम घेऊन गानसम्राज्ञी भारतरत्न स्व.लतादिदी मंगेशकर व अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांना सांगीतिक श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी गणाचार्य मठ संस्थानचे डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, माजी आ.कर्मवीर किशनराव राठोड, आमदार डॉ. तुषार राठोड, माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, आयोजक तथा सुप्रभातचे कार्याध्यक्ष डॉ. दिलीपराव पुंडे, नगराध्यक्ष बाबुराव देबडवार, कृऊबाचे सभापती खुशालराव पाटील उमरदरीकर, सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार, जिपचे माजी सदस्य बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, सुप्रभातचे संघटक अशोक कोतावार यांच्यासह संगीतमंचचे प्रा.वीरभद्र मठपती, प्रा.गोविंदराज कोत्तापले, प्रा.उत्तमकुमार वन्नाळे, सौ.उमाताई कोत्तापल्ले, कु.शुभांगी साखरे, प्रसंजीत भद्रे, सुरेंद्र भद्रे, शेलार रोडगे, कु.शुभांगी पांचाळ, कु.नंदीता स्वामी, कुलदीप कोत्तापल्ले यांची उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून गानसम्राज्ञी भारतरत्न स्व.लता दिदी व स्व.अनाथाची आई सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुखेड भूषण डॉ.दिलीपराव पुंडे यांनी करताना स्व. लतादीदी व स्व. सिंधूताई सपकाळ यांच्या जिवन कार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. सांगीतिक श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचा आरंभ शुभांगी पांचाळ यांच्या ज्योत से ज्योत जगाते चलो या गीताने करण्यात आला. यानंतर शुभांगी साखरे यांनी वंदे मातरम्, उत्तमकुमार वन्नाळे यांनी जय जय महाराष्ट्र माझा, वीरभद्र मठपती यांनी दिलं दिया है जान भी लेंगे, गोविंदराज कोतापल्ले यांनी जेथे जातो तेथे तू माझ्या सांगती, सौ.उमाताई कोत्तापल्ले यांनी ए मेरे वतन के लोगो, यांच्यासह अनेकांनी लतादिदीच्या अनेक रचना गायल्या. वीरभद्र मठपती यांच्या पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, माजी आ. कर्मवीर किशनराव राठोड, आमदार डॉ. तुषार राठोड, माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, नगराध्यक्ष बाबुराव देबडवार, प्राचार्य शिवदास आडकीने, सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार, उत्तम अण्णा चौधरी, डॉ. शारदाबाई हिमगिरे, डॉ. अविनाश पाळेकर, ज्ञानेश्वर डूमणे यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन साहित्यिक शिवाजी अंबुलगेकर यांनी केले तर तर आभार दादाराव आगलावे यांनी मानले.

यावेळी सुप्रभात, वैद्यकीय संस्था, इमा, जिप्सी मॉर्निंग ग्रुप, संजीवनी सकाळ, मायमराठी, पत्रकार संघ, वकील संघटना सदस्यांसह हणमंतराव मस्कले, नंदकुमार मडगुलवार, अरुण महाजन, माधव अण्णा साठे, सत्यवान गरुडकर, राजू घोडके, सं. सं. मस्कले, डॉ. आर. जी. स्वामी, डॉ.पी. बी. सीतानगरे, डॉ. एम. जे. इंगोले, डॉ.व्यंकट सुभेदार, डॉ.वीरभद्र हिमगिरे, वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल मुक्कावार, डॉ.फारुख, डॉ. माधव पाटील उचेकर, डॉ. रामराव श्रीरामे, डॉ.कैलास पाटील, डॉ.पांडुरंग श्रीरामे, डॉ.श्रीहरी बुडगेमवार, डॉ.प्रशांत खंडागळे, डॉ.प्रकाश पांचाळ, , डाॅ.फारुक शेख, डाॅ. अजय चौधरी, किशोरसिंह चौहान, किशनराव इंगोले, पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप कामशेट्टे, सचिव मेहताब शेख, राजेश बंडे, जिप्सीचे अध्यक्ष शेखर पाटील, जय जोशी, बालाजी तलवारे, संतोष महाराज स्वामी, संजीवनी सकाळचे अध्यक्ष बालाजी मटकुलवार, पत्रकार शिवाजी कोनापुरे, यशवंत बोडके, नामदेव यलकटवार,संपादक ज्ञानेश्वर डोईजड, दत्तात्रय कांबळे, बबलू शेख, किशोर संगेवार, नामदेव श्रीमंगले, भास्कर पवार, गोविंद पाटील जाधव, बसवराज चापुले, उत्तम कुलकर्णी, जिवन कवटीकवार, नारायणराव बिलोलीकर, सुर्यनारायण कवटीकवार, सुर्यकांत कपाळे, लक्ष्मीकांत चौधरी, प्रविण कवटीकवार, बालाजी वट्टमवार, दिनेश चौधरी, बालाजी डोनगाये, बश्वराज साधू, ज्ञानोबा जोगदंड, एकनाथ डुमने, रमेश पाटील, वैजनाथ दमकोंडवार, मुख्याध्यापक रमेश मैलारे, प्राचार्य अंकुश गायकवाड, सरवर मनियार यांच्यासह अनेक मान्यवर पुरुष महिला उपस्थित होत्या. यावेळी सिनेकलावंत डॉ. शिवानंद स्वामी यांनी कार्यक्रमाचे चित्रीकरण करुन गायकांचा उत्साह वाढवला.

Leave A Reply

Your email address will not be published.