नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी ! शहरातील काळेश्वर मंदिर व विष्णुपुरी प्रकल्प परिसरात उभारले जाणार बोटिंग क्लब व ॲडव्हेंचर पार्क

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली माहिती

651
नांदेड –
नांदेड शहराजवळ असलेल्या काळेश्वर मंदिर आणि विष्णुपुरी प्रकल्पाच्या बॅकवाटर परिसरात 12.25 कोटी रुपये खर्चून बोटिंग क्लब व ॲडव्हेंचर पार्क उभारले जाणार आहे. या 12.25 कोटीपैकी 4.63 कोटी निधीला आज मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली.

 

नांदेड शहरातील काळेश्वर मंदिर येथील विष्णुपुरी प्रकल्पाच्या बॅकवॉटर परिसरात बोटिंग क्लब व ॲडव्हेंचर पार्कला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. एकूण 12.25 कोटींपैकी सध्या या प्रकल्पासाठी 4.63 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे नांदेडच्या सौंदर्यात भर पडेल व पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वीच याच परिसरात मुंबईतील सी-लिंकच्या धर्तीवर उड्डाण पूल बांधण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री चव्हाण यांनी केली होती. त्यानंतर आता बोटिंग क्लब व ॲडव्हेंचर पार्क उभारणीची घोषणा त्यांनी केली असून यामुळे या परिसराचे कायापालट होऊन पुर्णतः रुपडेच बदलणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.