माळेगाव यात्रेत लोककला महोत्सवाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

497

नांदेड –

महाराष्ट्र राज्याच्या गौरवशाली परंपरेचे आणि लोककलेचे जतन करण्यासाठी व लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत आयोजित पारंपारिक लोककला महोत्सवाला रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.

नांदेड जिल्हा परिषद व लोहा पंचायत समितीच्या वतीने श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेनिमित्त आयोजित पारंपारिक लोककला महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा यात्रा सचिव मंजुषा जाधव-कापसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर.पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी थोरात, पोलीस निरीक्षक संतोष तांबे, उप सभापती नरेंद्र गायकवाड, चंद्रसेन पाटील, शंकरराव ढगे, रोहित पाटील, आनंदराव पाटील, गणेश शिंदे, गणेश उबाळे, रंवराव पाटील आदींच्या उपस्थित करण्यात आले.श्री खंडोबाच्या प्रतिमेचे पुजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांचा काठी आणि घोंगडी देवून सत्कार करण्यात आला.शाहीर प्रेमकुमार मस्के यांच्या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

हिराबाई डोंगरे यांच्या संचाने कारभारी दमानं… होऊ द्या दमानं, बाई मी लाडाची… कैरी पाडाची.. विविध लावण्या, खंडोबा गीत, वेस्टर्न, ग्रुप डान्स सादर केले.तुकाराम खेडेकरसह पांडुरंग मुळे तमाशा मंडळ मांजरवाडी या संचाने सादर केलेल्या चंद्रा व हिऱ्याची अंगठी या नव्या लावणी साद वर रसिक थिरकले. यावेळी कुंदा पाटील लोकनाट्य मंडळ, आनंद लोकनाट्य मंडळ, शाहीर मस्के यांचे स्वर सरगम, हिराभाऊ बडे यांची मुलगी शिवकन्या बडे नगरकर लोकनाट्य तमाम मंडळ नगरकर यांच्यासह विविध जिल्ह्यातील कलाकारांनी लोककला मंचावर सादर केलेल्या गीतांने रसिकांची मने जिंकली.अनेक जिवंत लोककलेचे बहुरंगी दर्शन यानिमित्त राज्याच्या रसिक प्रेक्षकांना मिळाले.या कार्यक्रमाला जिल्ह्यातील लाखो रसिक उपस्थित होते.

दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेची वैभवशाली परंपरा आहे. भाविक व रसिकांनीच यात्रेला मोठे केले असल्याचे प्रतिपादान उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव-कापसे यांनी केले. शासकीय यंत्रणेवरील यात्रेतील ताण कमी करण्यासाठी यात्रेकरूंनी सहकार्याची भावना ठेवण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रास्ताविक गट विकास अधिकारी शैलेश वावळे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन परशुराम कौशल्ये यांनी केले.सहाय्यक प्रशासन अधिकारी एस.डी.चोरमले, पी.एम.वाघमारे, विस्तार अधिकारी डी.आय.गायकवाड, धनंजय देशपांडे, एस.के.पाठक, प्रशांत गायकवाड आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.