फिरकीचा महान जादूगार हरपला ! ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचं निधन; क्रिकेट विश्वावर शोककळा

573

               

                   NEWS HOUR मराठी डेस्क 

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू, फिरकीचा जादूगार शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्नच्या व्यवस्थापनाने याबाबत माहिती दिली आहे. कोहसामुई, थायलंड येथे हृदयविकाराच्या झटक्याने वॉर्नचा मृत्यू झाला. वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही शेन वॉर्नला वाचवण्यात अपयश आले आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हा दुसरा धक्का आहे. रॉड मार्शच यांचेही गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी निधन झाले होते. शेन वॉर्नने क्रिकेटपटू मार्शच्या निधनावर शोक व्यक्त केला होता.

जगातील महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्ननेही अलीकडेच रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शेन वॉर्नने युक्रेनच्या बाजूने ट्विट करुन रशियाची कारवाई पूर्णपणे चुकीची असल्याचे वर्णन केले होते. वॉर्नने युक्रेनचे समर्थन केले आणि रशियाची कारवाई पूर्णपणे चुकीची, अवास्तव आणि अन्यायकारक असल्याचे म्हटले होते.

वॉर्न हा ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. या फॉरमॅट मध्ये त्याने 145 टेस्ट मॅचमध्ये 708 विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने 293 विकेट घेतल्या. वॉर्न हे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणा-या गोलंदाजांच्या यादीत श्रीलंकेच्या मुथ्यय्या मुरलीधरन नंतर दुस-या क्रमांकावर आहेत.

शेन वॉर्नने 1992 मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जानेवारी 2007 मध्ये त्यांनी सिडनीमध्येच इंग्लंड विरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.