लोह्यातील बोरगाव (आ) येथे राष्ट्रसंत गाडगे महाराजांना स्वच्छता मोहीम राबवून अभिवादन

99

लोहा, नांदेड –

तालुक्यातील बोरगाव (आ) येथील जि. प. प्रा. शाळेत राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती अभिनव पद्धतीने साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले. शाळेतील गुरुजन व शालेय विद्यार्थ्यांनी शाळा परिसरासह संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबवून गाडगे बाबांची जयंती साजरी करण्यात आली.

विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमासाठी प्रसिद्ध असलेली लोहा तालुक्यातील बोरगाव (आ) येथील एकमेव जिल्हा परिषद शाळेचा लौकिक आहे. सातत्याने शाळा व्यवस्थापनाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दि.23 रोजी बुधवारी शाळेत राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा, कर्मकांड आपल्या कीर्तनातून दुर करून या देशाला स्वच्छतेचा संदेश देणारे तसेच चालते बोलते विद्यापीठ राष्ट्रसंत गाडगे बाबा होते. प्रत्येकाने गाडगे बाबा यांच्या विचाराने जीवनात आचरण करणे काळाची गरज असल्याचे मत शाळेचे सहशिक्षक तथा मराठा सेवा संघाचे रमेश पवार म्हणाले.

यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी झाडू-खराटा घेऊन शाळा व आजूबाजूचा परिसरासह गावातील रस्ते स्वच्छ करून जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बळी पाटील शेलगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निवृत्ती पाटील, उपाध्यक्ष रंगनाथ पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे बहीशाल शिक्षण केंद्राचे वक्ते तथा उपक्रमशिल प्राथमिक पदवीधर शिक्षक रमेश पवार यांनी केले. सदर कार्यक्रमात अनेक विद्यार्थांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कुलकर्णी यांनी तर आभार सुचिता गोधणे- बनसोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक बालकिशन देशमुख, अंबर फुलसे, ज्योती फुके, राहुल हारडे आदींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.