हदगाव नगरपरिषदेची आरक्षण सोडत जाहीर, आरक्षण सोडतीत महिलांना 10 जागा

520

हदगाव, नांदेड –

हदगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि.13 जून रोजी हदगाव नगरपरिषद कार्यालयात उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, प्रभारी न.पा. मुख्याधिकारी दामोदर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदस्यपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये प्रभाग क्र.१ (अ) सर्वसाधारण महिला (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक : -२ (अ) अनुसूचित जाती महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक : – ३ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक : – ४ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक : – ५ (अ) अनुसूचित जाती सर्वसाधारण, (ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक : – ६ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक : – ७ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण,प्रभाग क्रमांक : – ८ (अ) अनुसूचित जाती महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक : – ९ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र. : – १० (अ) अनुसूचित जाती सर्वसाधारण, (ब) सर्वसाधारण महिला आरक्षण सुटले आहे.

आरक्षण सोडत जिल्हा परिषद शाळेतील अथर्व शहारे या विद्यार्थांच्या हाताने काढण्यात आले आहे.तसेच दिनांक १५ जून ते २१ जून या कालावधीत आरक्षण व त्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. २४ जून रोजी आरक्षण सोडतीचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रभाकर देशमुख, शिवा चंदेल, अमित अडसूळ, शिवसेना नेते जाकेर चाऊस, विनोद हमने, शशिकांत माळोदे, खदिर खान, शेख मुबिन, गुणवंत काळे यांच्यासह अनेक पक्षाचे  इच्छुक उमेदवार व न.पा. कार्यालयीन अधीक्षक सतिश देशमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.