रेतीमाफियावर हदगाव महसूल विभागाची करडी नजर !
एसडीएमच्या पथकाने 1 टिप्पर व 1 ट्रॅक्टर केला जप्त
हदगाव, नांदेड –
उपविभागीय अधिकारी, हदगाव ब्रिजेश पाटील यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरुन उपविभागीय अधिकारी, कार्यालयाचे नायब तहसिलदार तथा पथक प्रमुख,भरारी पथक बि.बि.हंबर्डे व त्यांच्या पथकाने दिनांक 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास अवैधरित्या 3 ब्रास रेती वाहतुक करणारा एक टिप्पर निवघा हस्तरा रोडवर पकडुन जप्त केले आहे. तसेच दिनांक 5 मार्च रोजी रात्री 7.45 वाजता मौ. बनचिंचोली येथे एक ट्रॅक्टर अवैध रेतीने भरलेले आढळून आले असता सदर ट्रॅक्टर जप्त करुन तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात लावल्यात आले आहेत. सदर दोन्ही वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे तहसिलदार हदगाव यांना आदेश देण्यात आले आहेत.
उपविभागीय अधिकारी, कार्यालयाच्या पथकाने आतापर्यंत एकुण 12 अवैध रेती वाहतुक करणारी वाहने पकडुन त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाया केल्या आहेत. सदर भरारी पथकाने आजपर्यंत एकुण 12 प्रकरणांत दंडात्मक कार्यवाही करुन 10,08,400/- रुपये इतका महसुल गोळा करुन शासनखाती जमा केला आहे. तसेच 02 प्रकरणात दंडात्मक कार्यवाहीची प्रक्रिया चालू असून संबंधिताकडून 2,73,000 दंड वसूल करण्यात येणार आहे. सदर कार्यवाया जिल्हााधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या आदेशान्वये, उपविभागीय अधिकारी, हदगाव ब्रिजेश पाटील तसेच तहसिलदार हदगाव जिवराज डापकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक प्रमुख बि. बि. हंबर्डे नायब तहसिलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय, हदगाव यांच्यासह शिवकुमार जयस्वाल अ.का, विशाल शेवाळकर महसुल सहायक, नागेश कोकरे, क.स यांनी केली.