हेमंतराव अकोलकर यांचे निधन

53
नांदेड –
नांदेडच्या ‘सिडको’ वसाहतीतील एनडी-४१, जय भवानी चौक परिसरातील रहिवासी तथा वाहन चालक हेमंतराव दत्तोपंत अकोलकर (वय-५४ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने एक फेब्रुवारी रोजी पहाटे उपचारादरम्यान, ससून हॉस्पिटल, पुणे येथे निधन झाले. दिवंगत हेमंतराव अकोलकर यांच्या पार्थिव देहावर १ फेब्रुवारी रोजी रात्री कात्रज, पुणे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, दोन भाऊ, भावजय, पुतणी, पुतणे व नातवंडे असा मोठा परिवार आहे. मनीष अकोलकर तसेच आदित्य अकोलकर यांचे ‘ते’ वडील आणि सिडको, नांदेड येथील गोदावरी पब्लिक स्कुलच्या सहशिक्षीका मोनाली देशपांडे तथा भाग्यश्री अकोलकर यांचे ‘ते’ मोठे दिर होत.

Leave A Reply

Your email address will not be published.