महामार्ग पोलिसांमुळे शेतकऱ्याला जीवदान

1,101
अर्धापूर, नांदेड –

गव्हाच्या शेतात पाणी देत असताना शेतकऱ्यास विषारी साप चावल्याने त्यांना उपचारासाठी नांदेड येथे रुग्णालयात घेऊन जात असतांना ॲम्ब्युलन्स बंद पडली असता या घटनेची माहिती महामार्ग पोलीसांना सांगताच महामार्गाच्या पोलिसांनी कार्य तत्परतेने जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. शेतकऱ्याची तब्येत चांगली असल्याची माहिती रूग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

दि.२० रविवारी रोजी शेतकरी आपल्या शेतात गव्हाला पाणी देत असतांना विषारी साप चावल्यामुळे उपचारासाठी घेऊन जात असल्याने रुग्णवाहिका बंद पडल्याने राजीव गंगाधर कारले यांनी शेख मुनिर शेख हैदर यांना सांगितले. त्यांनी महामार्ग पोलिसांना सांगून महामार्गाच्या रुग्णवाहिकेतून साहेबराव रामराव कारले, वय ४५ या शेतकऱ्यास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले‌ असल्याची माहिती महामार्गाचे श्रीराम कदम, गजानन फुलारी सेवक वसंत सिनगारे यांनी दाखल केले असून शेतकऱ्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती रूग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

महामार्ग रुग्णवाहिकेचे चालक श्रीरंग कदम यांचे पोलीस निरीक्षक अरूण केंद्रे, पोउनि ज्ञानेश्वर बसवंते, शेख ईकबाल, ज्ञानेश्वर तिडके आदींनी कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.