भारतीय सैन्यात हनी ट्रॅप, पाकिस्तानकडून 300 मुलींची भरती; भारतीय जवानांना करतायेत टार्गेट

904

NEWS HOUR मराठी नेटवर्क –

पाकिस्तानने पुन्हा एकदा आपल्या नापाक हरकती करण्यास सुरूवात केली आहे. भारतात दहशतवादी पाठवूनही काही होत नसल्याने, पाकिस्ताने हेरगिरीसाठी आता महिला एजंटचा वापर करत, घाणेरड्या प्रकारे घुसखोरी सुरू केली आहे. याची शिकार हे भारतीय सैन्यातील जवान ठरत आहेत. अशा हनी ट्रॅपला भारतीय सैन्यातील जवान प्रदीपकुमार बळी पडल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. या भारतीय जवानाची चौकशी केल्यानंतर तो गेल्या अनेक दिवसांपासून या हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणा या जवानाची चौकशी करत असून यातून अनेक धक्कादायक प्रकार उजेडात येत आहेत.

पाकिस्ताकडून ‘शेरनी प्रोजेक्ट’ मद्धे 300 महिला हेरांचा वापर

भारताविरुद्ध कट रचण्यासाठी पाकिस्तान पुन्हा आपले जुनेच डावपेच वापरत आहे. भारताने पाकिस्तानचे दहशतवादी प्लॅन हाणून पाडल्यानंतर पाकिस्तानने आता महिलांचा हेरगिरीसाठी वापर सुरू केला आहे. सध्या पाकिस्तानने शेरनी प्रोजेक्टमद्धे 300 महिला हेरांची फौज या कामी उभी करण्यात आली आहे, ज्यांचे लक्ष्य भारतीय लष्कराचे जवान आहेत. या पाकिस्तानी महिला आणि मुली सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय जवानांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत आणि काही जवानही यामध्ये ओढल्या जात आहेत.

भारतीय जवानांना पाकिस्तानच्या या कटावर संशय येऊ नये म्हणून, या हेरगिरी करणाऱ्या पाकिस्तानी महिला सैनिकांच्या बरोबर फोनवर बोलतात. बॉलिवूडच्या गाण्यांवर व्हिडिओ रील्स बनवून त्यांना पाठवतात. त्यांच्यासोबत लग्नाचे नाटक करतात. तसेच हिंदू देवी देवतांचे फोटो डीपीला लावतात आणि शेअरदेखील करतात. पाकिस्तानी हेराच्या जाळ्यात अडकलेल्या जवानाने हा धक्कादायक खुलासा केला आहे.

हनीट्रॅपमद्धे असा अडकला भारतीय जवान

दिसायला सुंदर असणारी एक पाकिस्तानी महिला एजंट सोशल मीडियावर अनेक प्रकारचे रील बनवत होती. ती बॉलीवूड गाण्यांवर बनवलेली रील सैन्यातील सैनिकांना पाठवायची व त्यांना आकर्षित करायची. सैनिकही तिच्यावर सहज फिदा व्हायचे. तपास आणि चौकशी दरम्यान समोर आले आहे की, पाकिस्तानी महिला एजंट भारतीय जवानांना अडकवण्यासाठी एक नव्हे तर अनेक नावांनी फसवितात.

यामध्ये मुली प्रिया शर्मा, पायल शर्मा, हरलीन कौर, पूजा राजपूत अशी नावे लावून वावरतात. यातील एका पाकिस्तानी महिला गुप्तहेराने स्वत: मध्य प्रदेशची रहिवासी असल्याचे प्रदीप नावाच्या जवानाला सांगून त्याच्याशी ती संवाद करत होती. तिने प्रदीपला दिल्लीत भेटून लग्न करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र त्याआधीच या महिला पाकिस्तानी एजंटचा खेळ उघडकीस आला. या फसवणुकीचा बळी ठरला असल्याचे प्रदीपने भारतीय गुप्तचर यंत्रणेला सांगितले.

सोशल मीडियावरील या दोघांच्या ओळखीनंतर दोघांनीही एकमेकांचा मोबाईल नंबर शेअर केला. 6 महिन्यांपासून दोघे व्हाटसअप चॅट, व्हाईस आणि व्हिडिओ कालद्वारे बोलत होते. प्रदीपने या ओळखीमद्धे त्याच्या कार्यालयातून लष्कराशी संबंधित गुप्त माहिती संबंधित महिलेला दिली होती. गोपनीय कागदपत्रांचे फोटोही व्हाटसअपवरून या महिलेला त्याने पाठवले होते. एवढेच नाही तर, आरोपीने स्वत:चे सीम कार्डही पाकिस्तानी महिला एजंटला पाठवले होते तसेच त्यावर आलेले असंख्य ओटीपीही शेअर केले होते. पाकिस्तानी महिला हेरांच्या निशाण्यावर भारतीय लष्कराचे अनेक सैनिक होते. मात्र प्रदीप त्याचा बळी ठरला. सध्या सुरक्षा यंत्रणा प्रदीपची कसून चौकशी करत आहेत, जेणेकरून पाकिस्तानचा हा हनी ट्रॅप कट पूर्णपणे हाणून पाडला येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.