अर्धापूर तालुक्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात शासकीय समित्या निवडी रखडल्या

गाव पातळीवर कार्यकर्त्यांना संधी मिळेल काय? याकडे लागले लक्ष

608

अर्धापूर, नांदेड –

सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न मार्गी लावून सोडवणूक व्हावी व त्यांची कामे लवकरात लवकर व्हावी त्यासाठी तालुक्यातील विविध शासकीय समित्या रखडल्यामुळे जनतेला चकरा मारण्याशिवाय पर्याय नाही असे बोलल्या जात आहे.

राज्यात गेल्या युती सरकारच्या काळात सुध्दा शासकीय समित्यांची निवड झाली नव्हती. सात वर्षांपासून विविध शासकीय समितीच्या निवडी रखडल्यामुळे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, प्रहार आदीसह महाविकास आघाडीत पक्षातील कार्यकर्त्यांना विविध पदे मिळतील या आशेने पदाधिकारी बॅनर, झेंडे, सोशल मीडियावर जाहिरात बाजी करून नेत्यांचा उदोउदो करतात त्यांना कोणत्या तरी शासकीय समिती वर सदस्य म्हणून तरी स्थान मिळेल या अपेक्षवर पक्षासाठी व नेत्यासाठी काहीपण करतात.पक्ष नेतृत्व फक्त यादी मागून कार्यकर्त्याना खूश करतात पण प्रत्यक्षात कार्यकर्ते बेजार होतात.

कार्यकर्त्यांची विविध शासकीय समित्यावर निवड झाली तर कार्यकर्तांचा मान सन्मान नक्कीच वाढेल यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी सर्वसामान्य कार्यकर्तांची विविध अशासकीय समित्यावर निवड करणे महाविकास आघाडी सरकार योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविणे सोपे होईल यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वरिष्ठ पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन विविध शासकीय समित्या निवड करणे गरजेचे आहे. तर महाविकास आघाडीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची निवड होईल की कान भरणाऱ्याची याकडे कार्यकर्तांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.