हिमायतनगर तालुक्यात चोरटे झाले पुन्हा सक्रिय; झोपेतून जागी झालेल्या नागरिकांवर केली दगडफेक

1,303

चांदराव वानखेडे,                                                      हिमायतनगर, नांदेड –

नूतन पोलीस निरीक्षकांनी पदभार घेताच शहरात विविध धंद्यांनी डोके वर काढले असून, आता चोरटेही सक्रिय झाले आहेत. चोरटे आल्याचे समजल्यानंतर झोपेतून जागी झालेल्या नागरिकांवर चोरटयांनी दगडफेक केले आहे. चोरट्यांनी पळसपूर गावात माजविलेल्या धुमाकुळामुळे नागरिकात भीतीचे वातावरण असून, या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे नूतन पोलीस निरीक्षका समोर मोठे आव्हान आहे.

गेल्या काही महिन्यापासून बंद झालेल्या चोरीच्या प्रकाराला पुन्हा एकदा नूतन पोलीस निरीक्षकाच्या आगमनानंतर सुरुवात झाली आहे. दि.१९ जूनच्या मध्यरात्रीला अज्ञात चोरट्यांच्या टोळीने हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपूर येथे धुमाकूळ घातला आहे. मध्यरात्रीला १२.३० वाजेच्या सुमारास दिगांबर वानखेडे यांच्या घराची कडी लावून चोरटयांनी किराणा दुकान फोडून ५० हजार रोख रक्कम घेऊन पळाले.चोरटे एवढ्यावरच न थांबता त्यांनी दुकानातील सामानाची नासधूस करून नुकसान केले आहे.

त्यानंतर चोरट्यानी १.२५ वाजता याच पळसपूर गावातील माधवराव हडसनकर यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला, सव्वा एकच्या दरम्यान जाग आल्याने माधवराव हडसनकर जागी झाले आणि इतरांना आवाज दिल्यामुळे चोरांनी दगडफेक केली त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर २ वाजता अवधुत देवसरकर यांचे दुकान फोडून रोख रक्कम १५ हजार दुकानातील २५ हजाराचे कपडे घेऊन पळ काढला. नागरिक पाठलाग करत असल्याने त्यांच्यावर दगडफेकही केली. चोरी करून पळणाऱ्या चोरट्यांनी गावातील अनेक नागरीकांनी बघितले असून, या चोरट्यांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा अशी मागणी पळसपूर येथील ग्रामस्थांनी केली आहे.

हिमायतनगर शहरातही मध्यरात्रीला चोरट्यांनी येथील दत्तनगर भागातील काही घरात शिरून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिक जागे झाल्याचे लक्षात येताच चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. शहरासह ग्रामीण भागात चोरटे सक्रिय झाल्याने पोलिसांची रास्त्रगस्त वाढविणे गरजेचे असून, चोरट्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरीकातून केली जात आहे.

पळसपुर गावात चोरांनी चोरी करण्याच्या अगोदर दोन-तीन दिवस गावात वेगवेगळ्या वस्तू विकण्याचं नाटक करून गावाची पुर्ण माहीती घेऊनच ही चोरी केली असल्याचा अंदाज गावातील नागरीक वर्तवत आहेत. त्यामुळे गावात भंगार घेण्यासाठी किंवा इतर वस्तू विक्रीला घेऊन येणाऱ्या लोकापासून येणाऱ्या काळात सावध राहावे लागेल अशी चर्चा गावात रंगत आहे. तर पुढील तपास बिट जमादार कागणे म्याडम हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.