हिमायतनगरात दोन पोलिसांसह पत्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
हिमायतनगर, नांदेड –
हिमायतनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन मोठी कारवाई न करण्यासाठी एका मुद्रांक विक्रेता तथा पत्रकाराच्या माध्यमातून दोन हजाराची लाच घेताना पोलीस जमादार आणि एका पोलीस कर्मचाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले असून. या प्रकरणी मु्द्रांक विक्रेत्या पत्रकारासह दोन पोलीसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी तक्रारदाराने दि.१३ फेब्रुवारी रोजी हिमायतनगर ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल वनदेव कनाके हे तक्रारदार यांचा भावाविरूध्द पोलिस स्टेशन हिमायतनगर येथे तक्रार दिल्यावरून मोठी कार्यवाही न करण्यासाठी व तक्रारदार यांच्यावर प्रतिबंधक कार्यवाही करून सोडून देण्यासाठी ५ हजार रुपये लाचेची मागणी करीत आहेत. दिलेल्या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड कार्यालयाकडून दि.१४ फेब्रुवारी रोजी पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणीत मुद्रांक विक्रेता तथा पत्रकार सय्यद मन्नान यांनी कनाके व शेख मेहबुब यांच्या करीता तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती २ हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले.
दि.१४ फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन हिमायतनगर परिसरात लावण्यात आलेल्या सापळयात पोहेका वनदेव कनाके व शेख महेबुब यांनी तक्रारदार यांच्याकडून सदरील कामासाठी २ हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारली म्हणून वनदेव गोवर्धन कनाके, वय 51 वर्ष, व्यवसाय नोकरी पोलीस हेड कॉन्स्टेबल, पोलीस स्टेशन हिमायतनगर, शेख मेहबुब शेख जिलानी, वय ४६ वर्ष, व्यवसाय नोकरी पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस स्टेशन हिमायतनगर व सय्यद मन्नान सय्यद अब्दुल वय ५४ वर्ष, व्यवसाय मुद्रांक विक्रेता तथा पत्रकार रा. बाजार चौक गल्ली हिमायतनगर यांच्या विरूध्द पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे गुरनं 25 / 2022 प्रमाणे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री अरविंद हिंगोले, पोलीस निरीक्षक, लाच प्रतिबंधक विभाग, नांदेड हे करीत आहेत.