अवघ्या 10 मिनिटांत हॅकर्सने सेवानिवृत्त झालेल्या लेखापालास घातला 6 लाख रुपयांना ऑनलाईन गंडा

534

नांदेड-

एका सेवानिवृत्त झालेल्या लेखपालास हॅकर्सने ॲपची लिंक पाठवून त्यात बँक खाते व इतर माहिती भरण्यास सांगितले. सेवानिवृत्त लेखापालने माहिती भरताच पाच वेळेस त्यांच्या खात्यातून तब्बल 5 लाख 89 हजार रुपये लंपास करण्यात आले आहेत. या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गोपाळकृष्णनगर येथील सेवानिवृत्त लेखापाल विनायक गोपाळराव फुटाणे यांच्या मोबाईलवर दि. 9 जानेवारी रोजी हॅकर्सने युनो ॲप या बँकेची लिंक पाठवली. त्यात अर्ज भरल्याप्रमाणे युजर आयडी, पासवर्ड, मोबाईल क्रमांक, एटीएम क्रमांक, सीव्हीसी ही माहिती भरून पाठविण्यात आली. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत फुटाणे यांच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने पाच वेळेस 5 लाख 89 हजार रुपये काढून घेण्यात आले.फुटाणे हे काही दिवसांपूर्वीच लघुलेखक या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीचे 14 लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात होते.

बँकेतून पैसे वजा झाल्याचा संदेश येऊ लागल्यानंतर त्यांना थेट संबंधित बँकेची संपर्क साधून आपल्या खात्यातील अन्य रक्कम वळती न होऊ द्यायची पुरेशी काळजी घेतली. फुटाणे यांच्या खात्यात 14 लाख रुपये एवढी रक्कम होती.थोड्याच वेळात फुटाणे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी अज्ञात आरोपी-विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याप्रणाने गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर आडे करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.