नांदेड जिल्ह्यात शिंदे गटात इनकमिंग सुरूच; खा.हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रवेश
नांदेड –
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना देखील निष्ठावंत शिवसैनिकांना कुठलाही मान सन्मान दिला जात नव्हता. त्यांच्या मतांचा आदर होत नव्हता. त्यामुळे सतत होणाऱ्या अपमानास कंटाळलेल्या शिवसैनिकांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवार आल्यापासून हिंदूत्वाचा विचार पुढे घेऊन जाणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करत शिंदे गटात प्रवेश करण्याचा सपाटा लावला आहे. खासदार हेमंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि.2) जिल्ह्यातील नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
यामद्धे लोहा – कंधार विधानसभेचे अध्यक्ष मिलिंद पवार, कंधारचे शिवसेना शहरप्रमुख धनराज (बाळु) लुंगारे, लोह्याचे माजी नगरसेवक तथा युवक काँग्रेसचे विधानसभा माजी अध्यक्ष युवराज वाघमारे, शेतकरी कामगार पक्षाचे युवक जिल्हा प्रमुख मारोतराव यजगे, लोहा मार्केट कमिटीचे सदस्य बालाजी बहिरे, युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस बालाजी सपूरे पाटील, माधव मस्के, गजानन मस्के, साईनाथ करडीले, शिवानंद पुयड, शिवाजी करडीले, शिवानंद जाधव, गजानन संगेकर, बामणीजी पाटील आवातिरक, माधव पुयड, प्रभाकर पुयड, परमेश्वर पुयड, लक्ष्मण पुयड, माधव पुयड, राजू पाटील खाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.
याप्रसंगी प्रवेश झालेल्या शिवसैनिकांचा योग्य तो मान सन्मान राखला जाईल व त्यांना कुठेही कमी पडू दिले जाणार नाही, सर्वांना सोबत आणि विचारात घेऊन विकास कामे केले जातील असा खासदार हेमंत पाटील यांनी शिवसैनिकांना विश्वास दिला. यावेळी जिल्हा प्रमुख आनंदराव बोंढारकर पाटील, शिवसैनिक श्याम वानखेडे यांची उपस्थिती होती.