खा.सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा नांदेडमद्धे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

578

नांदेड –

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासंदर्भात खालच्या पातळीवर केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटत आहेत. महाविकास आघाडीचे नेतेही चंद्रकांत पाटील यांचा निषेध करत आहेत. नांदेड शहरातही या वक्तव्याचे निषेध करण्यात आले. चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवती काँग्रेस राज्यभरात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर व शहराध्यक्ष डॉ. सुनिल कदम यांच्या मार्गद्शनाखाली आज नांदेडच्या आयटीआय येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध केला.

देशाच्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यावरून पुन्हा एकदा भाजप पक्षाचा मनुवादी चेहरा समोर आलेला आहे. त्यांचे हे वक्तव्य देशातल्या समस्त कष्टकरी यशस्वी स्त्री जातीचा अपमान आहे.त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला युवतींनी जोडे मारून जाहीर निषेध केला. तसेच चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवती काँग्रेस राज्यभरात अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रा.यु.काँ. नांदेड जिल्हाध्यक्षा ॲड.प्रियंकाताई कैवारे,सचिव डॉ.उज्वलाताई सावळे, सचिव अंजली भालेराव, नांदेड तालुकाध्यक्षा दीपमालाताई कंधारे यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.