नांदेडमद्धे नवं दाम्पत्याला आले थेट प्रधानमंत्र्याचे शुभेच्छा पत्र !

2,825

नांदेड –

लग्न म्हंटले की, प्रत्येकाकरिता तो जीवनातील अतीव आनंदाचा क्षण असतो. या आनंदाचा प्रसंगात एखाद्या मोठ्या नेत्यांची उपस्थिती लाभली किंवा एखाद्या नेत्यांच्या प्रत्येक्ष शुभेच्छा मिळाल्या तर आनंद गगनात मावेनासा होतो. मात्र एखाद्याला चक्क देशाच्या प्रधानमंत्राच्या शुभेच्छा मिळाल्या तर त्याचा आनंदाला पारावर उरत नाही.असाच काहीसा आनंद नांदेड येथील नवदाम्पत्याला अनुभवास मिळाला.

नांदेडच्या हदगाव तालुक्यातील पेवा येथील अ‍ॅड. अजयकुमार प्रकाशराव जाधव यांनी त्यांच्या लाडक्या ताईच्या लग्नाचे निमंत्रण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवले आणि चक्क प्रधानमंत्र्यांनी जाधव पाटील पेवेकर परिवाराचे अभिनंदन करीत नवदाम्पत्यास विवाहानिमित्त शुभेच्छा पाठविल्या आहे. त्यामुळे सध्या शहरात अ‍ॅड. अजयकुमार यांच्यासाठी आलेल्या प्रधानमंत्री यांच्या शुभेच्छा पत्राचीच चर्चा सुरू आहे.

जाधव परिवाराची कन्या भाग्यश्री हिचा विवाह पिंपळगावचे शिवानंद पाटील यांच्या सोबत दि.25 मार्च रोजी हदगाव येथे पार पडला, या निमित्ताने प्रधानमंत्री यांनी “पुढील आयुष्य सुखी व समृद्ध जावे असे म्हटले आहे, तसेच आपल्या विवाहाचे निमंत्रण मिळाल्याने मला आनंद झाला, तुमच्या कुटुंबाच्या आनंदाच्या क्षणी मला बोलावले त्याबद्दल धन्यवाद, नवजीवनाच्या वर-वधुस मनापासुन शुभेच्छा, असे मोदींनी पत्रात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.