नांदेडमद्धे पत्नीनेच केले प्रियकराच्या मदतीने पतीचे अपहरण; विवाहित प्रेयसीसह, प्रियकर व तीन मित्रांना अटक

5,373

नांदेड-

एखाद्या चित्रपटाची कहाणी वाटावी, इतक्या सराईत पद्धतीने एका विवाहित प्रेयसीने तिचा प्रियकर व तीन मित्रांच्या मदतीने पतीचे अपहरण केल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत.विवाहित महिलेसह प्रियकर व तिच्या मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नांदेडच्या भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती अशी की, एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकरासह अन्य तीन मित्रांसोबत आपल्या पतीचेच अपहरण केले. याप्रकरणी महिलेसह चौघांना भाग्यनगर पोलिसांनी अटक केली आहे.ही घटना एका कर सल्लागारासोबत घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील सोमठाणा येथील कर सल्लागार प्रकाश तुकाराम श्रीरामे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 मार्च 2006 रोजी गितांजली बळवंतराव हाके रा.हाटकरवाडी ता.चाकूर जि.लातूर यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले. या दाम्पत्याला एक 15 वर्षाचा मुलगा आणि एक 10 वर्षाची मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. साधारण महिन्यापुर्वी गितांजलीसोबत प्रकाश श्रीरामे यांचा वाद झाला. त्यावेळी ते नांदेडच्या मयुर विहार कॉलनीमधील आपले राहते घर सोडून भोकरच्या सोमठाणा येथे राहण्यास गेले.

सोमठाण्यावरुनच ते नांदेडला दररोज कामकाजासाठी ये-जा करत. दि.1 डिसेंबर रोजी ते नेहमीप्रमाणे नांदेडला कामानिमित्त आले असता त्यांची पत्नी गितांजली या जिल्हा परिषद कार्यालयासमोर भेटली व माझी मुले कुठे आहेत?, मला ते परत दे असे म्हणत वाद घालत होती. त्यानंतर आम्ही दोघे सायंकाळी चारच्या सुमारास मयुर विहार कॉलनीतील घरी गेलो. तेथे गितांजलीचा प्रियकर बालाजी शिवाजी जाधव,रा.दयासागर नगर दरोडा खुर्द, गितांजलीचे अन्य मित्र दिलीपसिंग हरीसिंग पवार, रा.एमजीएम कालेजसमोर, अवतारसिंघ नानकसिंघ रामगडीया, रा.बाबानगर नांदेड व अमोल गोविंद बुक्तरे, रा.नवी वाडी पुर्णा रोड, नांदेड हे सर्व तिथे आधीच होते. या सर्वांनी मला कार क्रमांक एम.एच.26 बी.क्यु. 0016 मध्ये डांबले व सौरभ बार मालेगाव रोड येथे नेले. त्यानंतर आमच्या कारमधून एक माणुस उतरून माझी पत्नी त्या कारमध्ये बसली आणि आपल्या प्रियकरासह इतर तीन मित्रांना मला जीवे मारण्यास सांगत होती. त्यानंतर गाडीतच मला मारहाण केली व मला औंढा जाणाऱ्या रस्त्यावर नेऊन सोडून टाकले अशी तक्रार दिली आहे.

वरील तक्रारीनुसार भाग्यनगर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 364, 383, 387, 342, 352, 324, 323, 504, 506 आणि 34 भारतीय हत्यार कायद्याच्या कलमांव्ये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून या प्रकरणात कार चालकाचे नाव प्रकाश श्रीरामे यांना माहीत नसून
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक सुनिल भिसे आणि पोलीस अंमलदार ओमप्रकाश कवडे हे करीत आहेत.

दरम्यान, या हैराण करणाऱ्या घटनेचा तपास भाग्यनगर पोलीसांनी फिल्मीस्टाईलमध्ये दोन तासामध्ये लावला आणि या घटनेतील आरोपींना अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.