नांदेडमद्धे बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचे शोले स्टाईल आंदोलन; शहरातील शोभानगर येथील घटना (पाहा व्हिडिओ)
नांदेड –
शहरातील एका 30 वर्षीय तरुणाने बायको नांदायला येत नसल्याने आज दि.20 रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास चक्क पाण्याच्या टाकीवर (जलकुंभ) चढून शोले स्टाईल आंदोलन केले असून देविदास बलदेवसिंग सिबिया, वय 30 असे तरुणाचे नाव आहे.
देविदास सीबिया याची पत्नी रेखा आणि तीन मुलं मागच्या काही दिवसापासून त्याच्यासोबत राहत नाहीत, त्यामुळे तो तणावात आहे. त्यामुळे सदर तरुणाने आपली बायको आणि मुलांना बोलावण्यासाठी शहरातील शोभानगर येथे असलेल्या चक्क पाण्याच्या टाकीवर चढून सकाळी १० वाजताच्या सुमारास शोले स्टाईल आंदोलन केले. बायको व मुलांना बोलवा अन्यथा, टाकीवरून खाली उडी मारू असा धमकीवजा इशारा त्याने दिला.
देविदास त्याची पत्नी आणि दोन मुलांसह हैद्राबादमध्ये कामास होता. काही दिवसांपूर्वी तो नांदेडला परतला. मात्र, कौटुंबिक वादातून पत्नी मुलांसह सासरवाडी हैद्राबाद मध्येच राहत होती. पत्नी नांदेडला येत नसल्याने देविदास हताश झाला होता.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धाव घेत, सदर तरुणास खाली येण्यासाठी विनंती केली. मात्र जोपर्यंत बायको आणि मुलं घरी येणार नाहीत, तोपर्यंत आपण खाली येणार नाही, असा निश्चय त्याने केला आहे. यावेळी शोभानगरच्या पाण्याच्या टाकीजवळ शोले स्टाईल आंदोलन बघण्यासाठी बघ्यांनी चांगलीच गर्दी केली होती. शेवटी तब्बल 4 तासाच्या प्रयत्नानंतर पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याची समजुत काढून त्यास टाकीच्या खाली उतरविले. अक्षरशः त्याने प्रशासन नाच्या नाकी नऊ आणले होते. बायकोसाठी त्याने हे फिल्मी स्टाईल आंदोलन केले खरे मात्र, बायकोने त्याच्या या आंदोलनाची दखल घेतली नाही. देविदासची आई व बहीण घटनास्थळी आल्यानंतरच तो खाली उतरला.