शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उपस्थितीत ॲड.सचिन जाधव यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

1,022

अर्धापूर, नांदेड –

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तसेच शिवसेना सचिव खा.विनायक राऊत, शिवसेना नेते आ.भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवकचे माजी प्रदेश सचिव ॲड.सचिन जाधव यांनी महाराष्ट्रातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्तांसह शिवसेनेत शिवबंधन बांधून दि.२० रविवारी रोजी मातोश्री येथे पक्ष प्रवेश केला आहे.

महाराष्ट्र राज्यात सध्या उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश धुमधडाक्यात सुरू असून राष्ट्रवादी युवकचे माजी प्रदेश सचिव ॲड.सचिन जाधव, सेवानिवृत्त प्राचार्य रावसाहेब जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना सचिव खा.विनायक राऊत, शिवसेना नेते माजी मंत्री भास्कर जाधव, जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांच्या नेतृत्वाखाली शिवबंधन बांधून महाराष्ट्रातील मुंबई, मराठवाडा, कोकण, विदर्भातील १५० पदाधिकारी व कार्यकर्तांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे.

यावेळी ॲड.सचिन जाधव म्हणाले की, आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका असल्याने अनेक पदाधिकारी शिवसेनेत दाखल होणे हा राष्ट्रवादीला मोठ्या धक्का बसला आहे.सचिन जाधव यांच्या पक्ष प्रवेशांचे शिवसैनिकांनी स्वागत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.