शिवसेना सचिव खा.अनिल देसाई यांच्या उपस्थितीत उपतालुका प्रमुख पदी नागेश पाटील सरोळे यांची निवड
अर्धापूर, नांदेड –
भोकर विधानसभा मतदारसंघात शिवसंपर्क अभियान कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेना सचिव तथा खा.अनिल देसाई व शिवसेना संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांच्या हस्ते शिवसेना उपतालुका प्रमुख निवड झाल्याचे नियुक्ती पत्र नागेश सरोळे पाटील यांना देण्यात आले आहे.
अर्धापूर तालुक्यात शिवसैनिक जोमाने कामाला लागले यांसाठी शिवसंपर्क अभियान व कार्यकर्तांच्या मेळाव्यात शिवसेना सचिव तथा खा.अनिल देसाई, शिवसेना संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, आ.बालाजी कल्याणकर, शिवसेना नेते धोंडू पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, जि.प.स. बबनराव बारसे, उपजिल्हाप्रमुख दता पाटील पांगरीकर, उपजिल्हाप्रमुख बालाजीराव कल्याणकर, तालुकाप्रमुख संतोष कपाटे, उपसभापती अशोक कपाटे, माजी जि.प.उपाध्यक्ष गंगाधर पाटील, माजी जि.प.सदस्य नागोराव इंगोले, बाळासाहेब देशमुख, शेतकरी नेते प्रल्हादराव इंगोले यांच्या हस्ते नागेश पाटील सरोळे यांची शिवसेना उपतालुका प्रमुख पदी निवड झाल्याचे नियुक्ती पत्र आदींच्या उपस्थितीत देण्यात आले.
शिवसेना उपतालुका प्रमुख नागेश पाटील सरोळे यांच्या निवडीचे शहरप्रमुख सचिन येवले, उपसरपंच भगवान पाटील पवार, शेतकरी सेनेचे रमेश क्षीरसागर,
चेतन कल्याणकर, कपील कदम, काजी सल्लावोद्दीन, शेख रफिक, अशोक डांगे, ओम नागलमे, बालाजी गोदरे यांच्यासह अनेकांनी स्वागत केले आहे.