जिल्हाधिकाऱ्यांसह नायगावचे तहसीलदार धृतराष्ट्राच्या भुमिकेत, नायगावातील बरबडा व इज्जतगावातून गोदावरीच्या पात्रातून मातीची लूट सुरूच; महसुलसह पोलीस प्रशासन चिडीचूप

364

नायगाव, नांदेड –

 

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा व इज्जतगाव येथील गोदावरी पात्रातून मातीची मोठ्या प्रमाणात लूट सुरू असताना नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे हे प्रशासनात धृतराष्ट्राची भूमिका चांगल्या रीतीने पार पाडत आहेत. गोदावरीचे सौंदर्य नष्ट होत असताना सुद्धा जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या डोळ्यावर पट्टी बांधल्यामुळे या भागात होत असलेल्या उत्खननाकडे दिवसाढवळ्या खुलेआम रॉयल्टीच्या नावाखाली गोदावरीची माती थेट नांदेडला घेऊन जात असल्यामुळे गोदावरीचे सौंदर्य नष्ट होत असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे.

नायगाव तालुक्यातील बरबडा , इज्जतगाव आणि राहेर येथे गोदावरीचे सौंदर्य नष्ट…

नायगाव तालुक्यात अनेक ठिकाणी माती व मुरमाचे उत्खनन होत असताना सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदाराच्या अर्थपूर्ण संबंधामुळे सदरचे सोनं नष्ट होत चालल्यामुळे शासनाच्या तिजोरीला चांगलाच फटका बसत आहे, अशा गंभीर बाबीकडे जिल्हाधिकाऱ्यांसह नायगावच्या तहसीलदाराचे हेतुपुरस्सर लक्ष नसल्यामुळे ग्रामीण भागातील बरबडा व राहेर इज्जतगाव या ठिकाणच्या गोदावरी नदी पात्रातील मातीच्या सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणात होत असताना केवळ तात्पुरती रॉयल्टीच्या नावाखाली मात्र हजारो ब्रास मातीचे उत्खनन होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व नायगावचे तहसीलदार हाताची घडी, तोंडावर बोट ठेवून बसले की काय? असा सवाल सामान्य जनतेतून केला जात आहे

नायगावच्या तहसीलदारानी किती ब्रास मातीची परवानगी दिली आणि किती वाहनाची नोंद आहे, कारण गुलदस्त्यात ??

बरबडा व इज्जतगाव गोदावरी पात्राच्या जवळील मातीच्या सोन्याची लूट होत असताना प्रशासकीय अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह नायगावच्या तहसीलदाराची तात्काळ बदली करण्यात यावी अशी ही मागणी जनतेतून जोर धरीत असून सदरच्या वाहतुकीमुळे रस्त्याची ही मोठ्या प्रमाणात खड्डे पडून वाट लागली असल्यामुळे व रस्त्यावरील धुरळा उडत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून घुंगराळा ते बळेगाव रुई बु सदरचा रस्ता हा पूर्वीच कमकुवत व नादुरुस्त असल्यामुळे याच मार्गावरून इज्जतगाव येथून होत असलेली अनेक हायवा वाहनाच्या टिप्परची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळे किती ब्रास मातीची परवानगी आणि किती वाहनाची नोंद तहसीलदाराकडे आहेत यांचा अंदाज लागत नसल्यामुळे अशा गंभीर बाबीकडे कोणताच संबंधित अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे दिवसाढवळ्या मातीच्या सोन्याची लूट होत असल्याच चित्र पाहावयास मिळत आहे.

राज्य महामार्गावरून वाहतूक होत असताना आरटीओ नेमके कुठे आहे ??

नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावरून या मातीची
क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असताना सुद्धा प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेडचे आरटीओ यांनी क्षमतेपेक्षा जास्त मातीची वाहतूक करत असलेले हायवा यांच्याकडे जड वाहतुकीची जबाबदारी असताना प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे जनतेतून महसूल, पोलीस व परिवहन या तिन्ही विभागाच्या सुरस कथा जनतेतून ऐकावयास मिळत आहेत.प्रशासनाच्या या भूमिकेमुळे बरबडा व इज्जतगाव येथील मातीचे सोने लुटण्यासाठी नांदेड येथून धनदांडग्या पार्ट्या ग्रामीण भागत सक्रिय झाल्या असून मातीच्या सोन्याची लूट होत असताना देखील जिल्हाधिकारी व तहसीलदार यांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्यामुळे जनतेतून संताप व्यक्त होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.