हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथील दहा वर्षांपासून बंद असलेल्या पोलीस चौकीच्या इमारतीचा लोकसहभागाच्या सहकार्यातून उदघाटन सोहळा

725

पुरुषोत्तम बजाज,

हदगाव, नांदेड –

मौजे बरडशेवाळा महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून शासनाने २०११-१२ मध्ये मौजे बरडशेवाळा ता. हदगाव येथे लाखो रुपये खर्च करून इमारतीचे बांधकाम केले. इमारत वापरात घेणे गरजेचे असताना दोन ते तीन वेळा दुरुस्ती करून ही इमारत दहा वर्षांपासून धुळखात पडून होती.

मनाठा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण व उपनिरीक्षक चिट्टेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते दहीभाते यांनी ही इमारत गरजेनुसार पोलिस चौकीसाठी वापरात आणण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक कार्यकर्ते गजानन अंनतवार कवानकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या खर्चात बगल देत लागणारा रंगरंगोटी खर्च देऊन सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला तर पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी स्वतः योगदान देत भूमिपुत्र डॉ.मंगेश मस्के, चंद्रशेखर गिरी, वसंतराव चौधरी, गजानन मोरे, दत्तराव नाईक, विशाल शिरफुले, दिनेश दहीभाते, आनंदराव मस्के, श्रीधर मस्के, पंडित नरवाडे चेंडकांपुर, गणेशराव मस्के, फारुख पिंजारी, विशाल कदम यांच्या आर्थिक योगदानातून सजावट झाली असल्याने शनिवार दि.१६ एप्रिल रोजी सकाळी ११वाजता मनाठा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या हस्ते छोटेखानी कार्यक्रमात उदघाटन करीत उपक्रमाचे कौतुक केले.तसेच योगदान देणाऱ्या व्यक्तीचा सन्मान केला.

यावेळी बरडशेवाळा सरपंच प्रतिनिधी ज्ञानेश्वर मस्के, पळसा सरपंच शिल्पा कांबळे, उपसरपंच भाऊराव सुर्यवंशी, रमेश राठोड गारगव्हान, पोलिस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिंगाबर कदम मार्लेगाव, दत्तात्रय मस्के बरडशेवाळा, सुर्यवंशी तांलग , डॉ.आनेराव करमोडी,बिट जमादार मधुकर पवार, कॉन्स्टेबल आनंद वाघमारे, पत्रकार इस्माईल पिंजारी, पत्रकार हिमांशु इंगोले, मनाठा पोलिस स्टेशनचे देशमुख, नरवाडे, हटकर मॅडम, भुरके मॅडम, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजीव नाईक, भगवानराव मस्के, गणेशराव मस्के, आनंदराव मस्के, दिपक पाटील पळसेकर, हालबोले, यशवंत सेनेचे तालुका अध्यक्ष गंगाधर मस्के, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष अवधूत मस्के, बालाजी जमदाडे, सुभाष जमदाडे, यांच्यासह कार्यक्षेत्रातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, प्रतिष्ठित नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.सुत्रसंचलन शिक्षक चिल्लोरे यांनी तर आभार आयोजक प्रभाकर दहीभाते यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.