माहुरच्या आनंद दत्तधाम आश्रमात शिक्षण परिषदेचे थाटात उदघाटन 

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चीत करून नियोजनबद्ध अभ्यास केल्यास ध्येय गाठणे कठीण नाही - गोविंद नांदेडे

606

माहूर, नांदेड –

विद्यार्थ्यांनी आपले धेय्य निश्चित करून ध्येय गाठण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास केल्यास कोणतेही ध्येय गाठणे कठीण नाही असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी केले. माहूर येथील आनंद दत्तधाम आश्रम उर्फ वसमतकर महाराज मठ येथे संत बाळगिर महाराज स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने आयोजित दोन दिवसीय विद्यार्थी पालक मेळावा व शिक्षण परिषदेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. पुढे बोलताना नांदेडे यांनी आनंद दत्तधाम आश्रमाच्या सप्तसूत्री उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. अध्यात्माच्या माध्यमातून राबवीत असलेले समाजउपयोगी उपक्रम हे अनमोल असल्याचे सांगून या शिक्षण परिषदेत सहभागी झालेले सर्वच विद्यार्थी त्यांचे ध्येय गाठल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सकाळी ७ वा.आनंद दत्तधाम आश्रम ते माहूर शहरातील कपिलेश्वर मंदिरापर्यंत स्वच्छता दिंडी व ग्रंथ दिंडी काढण्यात आली.यावेळी कपिल नाईक, माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी दिंडीला भेट देऊन शिक्षण परिषदेला माजी आ.प्रदीप नाईक यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या व स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. दिंडीच्या मार्गातील महापुरुषाचे चौक नाम फलकास पुष्पहार अर्पण करून कपिलेश्वर मंदिरात दिंडीची सांगता झाल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये आनंद दत्तधाम आश्रम माहूर येथे ११ :०० वा. विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.

या विद्यार्थी पालक मेळावा व शिक्षण परिषदेचे मठाधीश द.भ.प. साईनाथ महाराज बितनाळकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. तर सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे, देविगिरी प्रांतचे संघ प्रमुख जगाडे, सीताराम ठाकरे, प्रकाश पाटील भुसारे, माजी सभापती आनंदराव ग्यादलवार, शिवाजी पाटील, भाऊराव पाटील हडसनीकर जगदीश पाटील भोसीकर, जयकुमार अडकीने, विजय आमले, पद्मा गीऱ्हे, सुरेखा तळणकर, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिगांबर जगताप, सुधीर जाधव,मिलिंद कंधारे, भाग्यवान भवरे यांचे उपस्थितीत विद्यार्थाना मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या सत्रात शिवाजीराव कपाळे, मुख्याध्यापक थोटवे, यांनी मार्गदर्शन केले. आनंद दत्तधाम आश्रमाच्या वतीने शिक्षण परिषदेत सहभागी झालेली विद्यार्थी, पालक व शिष्य मंडळाकरिता नास्ता व सुरुची भोजनाची चोख व्यवस्था केली.

कार्यक्रमास विलासराव शिंदे रोहीपिंपळगावकर, पुंडलिक हुंबे, पंजाबराव माने, नथूजी भांगे, दिलीपराव कोपरकर, गजानन कलाने, रमेश तमखाने, कुंडलिक क्षीरसागर, संजय घोगरे, विनोद भारती आदिसह राज्यभरातून शिक्षण परीषदेत विद्यार्थी व पालक मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक अनिल सुरोशे यांनी तर सूत्रसंचालन एस.एस.पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.