वाई येथील संत सेवालाल महाराजाच्या मंदिराच्या जागेच्या हक्कासाठी झालेल्या केसेस मधून निर्दोष मुक्तता

काॅ.अर्जुन आडे सहित 18 लोकांवर नोंद झाले होते गुन्हे

442

जयकुमार अडकीने, 

माहूर, नांदेड –

माहुर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या वाई बाजार येथे गेल्या अनेक वर्षांपासून संत सेवालाल महाराज मंदिरासाठी वाई बाजार येथील नविन बस स्टॉपवर असलेल्या मोकळ्या जागेवर समाजाची अस्मिता असलेली जगतगुरू संत सेवालाल मंदिर असावे असी समाज बांधवाची भावना होती व ती रास्त पण होती. वाई बाजारसह परिसरात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज वास्तव्यास असुन या समाजाचे कुलभुषण संत सेवालाल आहेत. तर समाजासाठी एक भव्य दिव्य मंदिर उभारून पवित्र तिर्थस्थळ उभे रहावे ही समाज बांधवा सह कै. आर.आर. राठोड नाईक यांची भावना होती त्यासाठी मंदिर उभारणीच्या कामासाठी जागा ताब्यात घेत असल्याने 2016 मध्ये वाई येथील सेवालाल महाराजाच्या जागेसाठी झालेल्या लढ्यात कलम 143, 447, 109 अंतर्गत 18 लोकांवर गुन्हे दाखल झाले होते.

वाई येथे डाॅ.आर.आर राठोड आणि दशरथ नाईक यांच्या हस्ते मांडण्यात असलेल्या सेवालालच्या मंदिराला २००×२००ची जागा मिळवण्यासाठी बंजारा समाजाच्या वतीने मागणी करण्यात येते होती, पण आलटुन पालटून आलेल्या सर्वच ग्रामपंचायतीनी त्या त्यावेळी फक्त आश्वासनांची पोळी भाजली. त्यावेळी झालेल्या बंजारा समाजाच्या बैठकीत एक मताने निर्णय होऊन, वाई येथील सेवालाल महारांजाची जागा ताब्यात घेण्याचे ठरवले, पण नेहमी प्रमाने प्रस्थापित बंजारा पुढाऱ्यांनीगच्या दाराने पळ काढले, अशा वेळी काॅ.अर्जुन आडे, काॅ.प्रल्हाद चव्हाण, दशरथ नाईक, नामदेव जाधव, विलास पवार, सुभाष जाधव, सुदर्शन राठोड, विनय राठोड, जयसिंग राठोड, मंगु आडे, रवी राठोड, सुभाष जाधव, घनशाम जाधव, दुरनसिंग जाधव, राजु राठोड, स्व.नारायन नाईक राठोड, स्व.काॅ.दिलीप गवळी यांच्या नेतृत्वात हजारो बंजारा समाजाने वाई येथील मुख्य चौकाची (२००×२००) जागा ताब्यात घेतली.

स्थानिकांच्या दबावाने पोलिसांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या 18 लोकांवर गुन्हे दाखल केले, गेली 7 वर्ष चाललेल्या या केसेस संबंधि निर्णय देत आज अखेर मा.न्यायालय माहुर यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली. ॲड.चेतन राठोड, ॲड.विशाल चव्हाण यांनी निःशुल्क आंदोलकांच्या बाजूने केस लढवली.

पण नंतरच्या काळात स्थानिकांनी आंदोलकांशी विचार विनिमय न घेता मध्यस्थी करुन घडवून (६०×६० ) ची जागा ग्रा.पंचायत कडून घेण्यात आली, अजून पण संपूर्ण जागेचा लढा बाकी आहे. वाई बाजार प्रमाणे किनवट /माहुर तालुक्यात प्रत्येक शहर आणि सर्कलच्या गावात संत सेवालाल महाराजाच्या मंदिरासाठी जागा मिळवून घेण्याचा निर्धार करु असे काॅ.अर्जुन आडे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.