प्रज्ञा बौध्दविहारात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीबा फुले यांचे पुतळे बसवा- गटनेते बाबुराव लंगडे

511

अर्धापूर, नांदेड –

येथील प्रज्ञा बौद्धविहारात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळे त्वरित बसविण्यात यावे तसेच लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या मलसिद्धया स्वामी थोरला मठाचे सुशोभीकरण करण्यासाठी त्वरीत निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्याकडे भाजपा गटनेते बाबुराव लंगडे, तालुका उपाध्यक्ष प्रल्हादराव माटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

शहरातील प्रज्ञा बौद्धविहाराचे बांधकाम पूर्ण होऊन अनेक वर्षे झाले असून प्रज्ञा बौद्धविहारात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांचे पुतळे बसवण्यासाठी तसेच लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या मलसिध्दया स्वामी थोरला मठ सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे नगरपंचायत मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या नगरपंचायत गटनेते बाबुराव लंगडे, तालुका उपाध्यक्ष प्रल्हादराव माटे यांनी केली आहे.

            निधी मिळताच लगेच कामे सुरू करू…         – छत्रपती कानोडे, नगराध्यक्ष.

शहरातील प्रज्ञा बौद्धविहारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचे पुतळे बसवण्यासाठी तसेच मलसिद्धया स्वामी मठासाठी बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा सुरू असून निधी मिळताच विकास कामे सुरू करण्यात येतील अशी माहिती नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, उपनगराध्यक्षा यास्मिन सुलताना मुस्वीर खतीब, गटनेत्या सौ.शैलजाताई राजेश्वर शेटे, नगरसेविका डॉ.पल्लवीताई विशाल लंगडे, सौ.वैशालीताई प्रविण देशमुख यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.