आंतरराष्ट्रीय खेळाडू दिपा गवळे यांनी केले NIS प्रशिक्षण पुर्ण

199

नांदेड –

नांदेड जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू कु.दिपा प्रकाश गवळे यांनी पटियाला येथे भारतीय खेल प्राधिकरण अंतर्गत जानेवारी ते मार्च या कालावधीत NIS Certificate Course चे प्रशिक्षण पुर्ण करीत उत्तम गुणांकन संपादन केले व नांदेड जिल्ह्यातील पहिली महिला Boxing NIS Coach चा मान मिळविला आहे.

तिच्या या यशाबद्दल सौ.सोनल रावका,अध्यक्षा असो. वोविनाम मार्शल आर्ट, नांदेड, शंशाक कठाडे, सदस्य, वोविनाम असो.ऑफ इंडिया, किरण गवळे, संचालक वोविनाम मार्शल आर्ट अकॅडमी नांदेड, फारुख शेख- आंतरराष्ट्रीय खेळाडू आदींनी दिपाचे अभिनंदन केले आहे. तसेच मा.शंकर महाबळे, अध्यक्ष वोविनाम असो.ऑफ महाराष्ट्र व भाग्यश्री महाबळे, सचिव वोविनाम असो.ऑफ महाराष्ट्र यांचे दिपाला मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.