अर्धापुरात महिला व बालविकास विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा
अर्धापूर, नांदेड –
प्रज्ञा बौद्ध विहारात जागतिक महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ व पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
जागतिक महिला दिनानिमित्त एकात्मिक बाल विकास प्रकल्प नांदेड अधिकारी मिलिंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी पर्यवेक्षक सौ.मंदाकिनी जोशी, संरक्षण अधिकारी एम. आर. पांडागळे, ॲड.भानुदास मगरे, डॉ.पवार, माजी नगराध्यक्षा सौ.प्रणिता उमाकांत सरोदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त माजी नगराध्यक्षा सौ.प्रणिताताई सरोदे यांच्या वतीने उपस्थितीत महिलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पर्यवेक्षक मंदाकिनी जोशी, ॲड.भानुदास मगरे, डॉ.पवार, एम.आर.पांडागळे यांनी आरोग्य विषयक काळजी, महिला संरक्षण कायदा, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण आदी विषयावर शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मार्गदर्शन करून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.