ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार होण्यासाठी आरोग्य शिबिरे घेणे काळाची गरज- नगराध्यक्ष छत्रपती कानोडे
ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे भव्य आरोग्य शिबीर संपन्न
अर्धापूर, नांदेड-
सर्वसामान्य जनतेला उपचारासाठी मोठ्या रूग्णालयाचा खर्च झेपत नसल्याने अर्धापूर तालुक्यातील जनतेला चांगल्या प्रकारचे उपचार, आरोग्य सेवा मिळावी यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी ग्रामीण रुग्णालय सुरू केले असल्याचे वक्तव्य शिबिराचे उदघाटक म्हणून बोलताना नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांनी केले.
ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे आझादी का अमृत महोत्सव निमित्त मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर, तर उद्घघाटक म्हणून नगराध्यक्ष छत्रपती कनोडे, प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष प्रतिनिधी मुसव्वीर खतीब, गटविकास अधिकारी कदम, ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.अनंत पाटील, डॉ.विलास धनगे, डॉ.पवार, जिल्हा आयुष्य अधिकारी डॉ.संदेश जाधव, डॉ.सदानंद शिंदे, डॉ.उत्तमराव इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालयात सर्व रोगावर आधुनिक पध्दतीने उपचार होण्यासाठी रूग्णालयातील डॉक्टरांनी रूग्ण आपल्या पैकीच कोणीतरी आहे. यासाठी रूग्णावर योग्य निदान होऊन लवकरात लवकर त्याची तब्येत चांगली होईल याची काळजी घ्यावी असे आवाहन उपस्थित डॉक्टरांना नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांनी केले आहे.या शिबिरास ५०० रुग्णांची तपासणी करून योग्य औषध उपचार करण्यात आले.
शिबिरास एम.डी.मेडीसीन डॉ.तजमुल पटेल, सर्जन पोटविकार तज्ञ डॉ.लक्ष्मण नाईक, बालरोगय तज्ञ डॉ.बालाजी माने,स्त्री रोग तज्ञ डॉ.ललिता सुस्कर, डॉ. मोहम्मद रेहमान, डॉ.मो.शाहेद मो.ताहेर, डॉ.पवार, डॉ.एस एस शिंदे, डॉ.टाक, डॉ.विशाल लंगडे, डॉ.जावंत्रे मॅडम या शिबिरास Telemedicine ची सेवा, तसेच NCD, व MJ-PJAY/PM-JAY, हेल्थ कार्ड, RSBK अंतर्गत बालकांची तपासणी करून व विविध प्रकारच्या रक्तची तपासणी व औषध उपचार मोफत करण्यात आले.
आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ लिपिक एहेतेशामउद्दीन, मो.फाहीमोद्दिन, एस.व्हीस्कर, एस. सुगावे, एस.मोहिउद्दीन, एस.साजिद आली, पी.पी. ससाणे, एस.बी.जाधव, एस.एन.अलसटवार, ए.जी.संगेवार, एस. चव्हाण, अ.वी.सरपाते, एस.एस.जुकुले, सी.सुर्यवंशी, एम. हिंगमिरे, आरोग्य पर्यवेक्षीका डी.येेरावाड, बालविकास पर्यवेक्षीका मंदाकिनी जोशी व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.