श्रीसंत रविदास महाराज यांचे विचार सर्वसामान्यांत रुजविणे काळाची गरज -नगराध्यक्ष छत्रपती कानोडे
अर्धापूर, नांदेड –
श्रीसंत रविदास महाराज यांच्या कार्याचा आदर्श घेऊन त्यांच्या विचारांची तळागाळातील सर्वसामान्यांत रुजविणे गरजेचे असून श्रीसंत रविदास महाराज यांनी दाखवलेल्या मार्गावर जाऊन व भावी पिढी स्पर्धेत टिकविण्यासाठी सर्वांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांनी बोलताना केले.
श्रीसंत रविदास महाराज यांच्या ६४५ व्या जयंती निमित्त नियोजित स्मारक अर्धापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड, प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष ॲड. किशोर देशमुख, उपनगराध्यक्ष प्रतिनिधी मुस्वीर खतीब, शहराध्यक्ष राजेश्वर शेट्टे, पोलीस निरीक्षक अशोक जाधव, संचालक प्रविण देशमुख, तुकाराम टोंम्पे, नगरसेवक बाबुराव लंगडे, नामदेव सरोदे, डॉ. विशाल लंगडे, व्यंकटी राऊत, ॲड.योगेश माटे, पत्रकार सखाराम क्षीरसागर, उद्धवराव सरोदे, जिल्हा महासचिव उमाकांत सरोदे, माजी नगरसेवक शिवराज जाधव, माजी उपसरपंच ओमप्रकाश पत्रे, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष संदिप राऊत, गोविंद साखरे, गोविंद माटे, आनंद सिनगारे, रूद्राजी सिनगारे, महेंद्र सरोदे, अझर काजी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्रीसंत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून तसेच नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात केली. यावेळी प्रमुख पाहुणांच्या सत्कार जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड म्हणाले की, श्रीसंत रविदास महाराज यांच्या विचारांचे समाज प्रबोधन होणे गरजेचे आहे त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून समाज घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करून श्रीसंत रविदास महाराज यांना अपेक्षित असलेले विचार समाजात रूजवा असे आवाहन गायकवाड यांनी केले.
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष गजानन जोगदंड, विष्णु जोगदंड, शिवाजी सोनटक्के, सुरेश पतंगे, होनाजी जोगदंड, गोविंद माऊली जोगदंड, लक्ष्मण साखरे, कचरू जोगदंड, बालाजी गंगासागरे, केशव जोगदंड, कुनाल साखरे, पुंजाजी विणकरे, प्रभाकर साखरे, रोहिदास बनसोडे, केशव जोगदंड, लक्ष्मण साखरे, गजानन साखरे, प्रवीण विणकरे, रामप्रसाद घोडेकर, प्रवीण सोनटक्के, रमेश विणकरे, विनोद दुधंबे, संतोष जोगदंड, साईनाथ साखरे, रवी साखरे, माधव जोगदंड, गणेश विणकरे, सौ.शिवनंदा जोगदंड, सौ.गोकर्णा जोगदंड, सौ. प्रियंका जोगदंड, सौ. छाया विणकरे, सौ.वंदना जोगदंड, रूपाली कांबळे यांच्यासह महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.