किनवट-माहूर विधनासभा युवक काँग्रेस अध्यक्ष पदी अमोल केशवे यांची बहुमताने निवड
माहूर, नांदेड-
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या युवक काँग्रेस अंतर्गत पदाधिकारी निवडणुकीत किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अमोल अनंतराव केशवे हे बहुमताने विजयी झाले आहेत.
माहे नोव्हेंबर- डिसेंबर २०२१ मध्ये या पदासाठी मतदान घेण्यात आले तर दि. ७ मार्च २०२२ रोजी मतमोजणी करण्यात आली. पालकमंत्री अशोकराव चव्हाण, माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत, आ.अमरनाथ राजूरकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर यांच्या मार्गदर्शनात या पदाकरिता अमोल केशवे यांनी ही निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत आशिष कऱ्हाळे, अभय चौधरी अमोल केशवे हे उमेदवार स्पर्धेत होते. निवडणुकीसाठी एकूण २२३१ पैकी २०७६ मतदारांनी मतदान केले, त्यामध्ये अमोल अनंतराव केशवे यांना १६६९ मते मिळाल्याने ते किनवट-माहूर विधनासभा युवक काँग्रेस अध्यक्ष पदी तर आशिष कऱ्हाळे यांना ३७२ मते मिळाल्याने किनवट-माहूर विधनासभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष पदी, तर अभय चौधरी यांना ३५ मते मिळाल्याने किनवट-माहूर विधनासभा युवक काँग्रेस सरचिटणीस पदी निवड झाली.
अमोल केशवे यांनी गतवर्षी झालेल्या माहूर तालुक्यातील आष्टा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पॅनलप्रमुख म्हणून त्यांच्या नेतृत्वात मोलाची भूमिका बजावून ग्रामपंचायतवर एकतर्फी सत्ता आणल्याने त्यांच्या नेतृत्वाची चुणूक दिसून आली त्यामुळे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भरघोस मते देऊन किनवट-माहूर विधनासभा युवक काँग्रेस अध्यक्ष पदावर विराजमान केले.
त्यांच्या निवडी बद्दल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय राठोड, नां.जि.म.स. बँकेचे संचालक प्राचार्य राजेंद्र केशवे, विमुक्त जाती भटक्या जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण किसन राठोड, युवक काँग्रेस वैद्यकीय सहाय्यता आघाडीचे राज्य समन्वयक डॉ.निरंजन केशवे,काँग्रेस शहराध्यक्ष आनंद तुपदाळे, माजी उपनगराध्यक्ष सौ.अश्विनीताई तुपदाळे, नगरसेवक प्रा.विलास भंडारे, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष दिलीप मुनगिलवार, विश्वनाथ कदम, जब्बारभाई, रहेमत अली, सौ.प्रभावती मडावी, काँग्रेस माहुर तालुका प्रवक्ते जयकुमार अडकिने, दत्तात्रेय शेरेकर,खाजाभाई, सलीम खाकरा, सचिन बेहेरे, आकाश कांबळे, राजु सौंदलकर, भाग्यवान भवरे, संजय आराध्ये, सिद्धार्थ तामगाडगे, मोहसीन ठेकेदार, अनिल माडपेलीवार, निसार कुरेशी, करीम शहा, अजीम सय्यद, विक्रम राठोड, प्रमोद राठोड, सचिन बेहेरे, राजकिरण देशमुख, लुकमान सौदागर, उत्तम परसवाळे, सोनू राठोड, अबेद खिची, लुकमानभाई, गफारभाई, अमोल कदम, दीपक मुरादे, राजेश मगरे, आदीसह अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.