प्रहार दिव्यांग संघटनेच्या माहूर तालुकाध्यक्षपदी तिसऱ्यांदा किशोर हुडेकर यांची बिनविरोध निवड

71

माहूर, नांदेड –

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक राज्यमंत्री ना.बच्चूभाऊ कडू, जिल्हाप्रमुख विठ्ठलराव मंगनाळे यांचे मार्गदर्शनात नांदेड उत्तर जिल्हाप्रमुख पंढरीनाथ हुंडेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सचिव मारोती मंगरुळे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झालेल्या प्रहार दिव्यांग संघटनेच्या माहूर येथील कपिलेश्वर धर्मशाळेत बैठकीत पुढील कालावधीकरिता प्रहार दिव्यांग संघटनेच्या माहूर तालुकाध्यक्ष निवडीसंदर्भात सविस्तर चर्चा करून किशोर हुडेकर यांना तिसऱ्यांदा तालुकाध्यक्ष पदावर नियुक्ती देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आल्याने, हुडेकर यांची प्रहार दिव्यांग संघटनेच्या माहूर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

याच बैठकीत उर्वरित कार्यकारिणीचीही निवड करण्यात आली. त्यामध्ये माहूर शहराध्यक्ष- बळवंत नागरगोजे, तालुका सचिव- गणेश जाधव, तालुका उपाध्यक्ष- रविंद्र बेहेरे, शहर उपाध्यक्ष- रुपेश जगताप, वाई बा.सर्कलप्रमुख -मोतीसिंग ठाकूर, वानोळा सर्कलप्रमुख -प्रभाकर नेवारे, लखमापूर सर्कलप्रमुख-विलास दवणे,महिला तालुकाध्यक्ष- आशाताई जाधव, महिला शहर अध्यक्ष- वैशाली शेंडे, महिला तालुका सचिव उज्वला चव्हाण यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकारी यांना उत्तर जिल्हाप्रमुख पंढरीनाथ हुंडेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली.

यावेळी माहूर तालुक्यातील प्रहार दिव्यांग संघटनेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने माझ्यावर विश्वास टाकून तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी देऊन दिव्यांग बांधवाची अविरत सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल नूतन तालुकाध्यक्ष किशोर हुडेकर यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक राज्यमंत्री ना. बच्चूभाऊ कडू, जिल्हाप्रमुख विठ्ठलराव मंगनाळे, उत्तर जिल्हाप्रमुख पंढरीनाथ हुंडेकर, जिल्हा सचिव मारोती मंगरुळे यांचे तालुक्यातील प्रहार सेवकांचे यावेळी आभार मानले.

तालुक्यातील दिव्यांग बांधवांचे सर्व प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध असून प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक राज्यमंत्री ना. बच्चूभाऊ कडू, जिल्हाप्रमुख विठ्ठलराव मंगनाळे व प्रहारचे सर्व पदाधिकारी यांच्याशी समन्वय राखून टाकलेल्या विश्वासास पात्र ठरेल असी ग्वाही यावेळी नूतन तालुकाध्यक्ष किशोर हुडेकर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.