आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या आरोपीला कुंटूर पोलिसांनी घेतले ताब्यात; आरोपीकडून लॅपटॉप, 3 मोबाईल व रोख रक्कम जप्त

539

नांदेड –

जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या कहाळा बु. येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाला गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या आयपीएलच्या क्रिकेट मॅचवर सट्टा लावताना रंगेहात पकडल्याची घटना दि.24 मे रोजी घडली आहे. 

कुंटुर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या आदेशानुसार फौजदार दिनेश येवले यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संजय अटकोरे आणि त्यांच्या पोलीस टीमने आरोपी शेख करीम मोदीन उर्फ निसार पिता हुस्सेन यांना कुंटूर पोलिसांनी रंगेहात पकडले असल्याची घटना दि.24 मे रोजी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान कहाळा येथे घडली असल्याची माहिती ठाणे अंमलदार साईनाथ शिंदे यांनी दिली आहे.

हेही वाचा –

नांदेडमद्धे खाकी वर्दी घालून ‘वन परिक्षेत्र अधिकारी’ बनून फिरणारा तोतया अधिकारी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे कहाळा बु.येथे गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स येथे आयपीएल मॅच चालू असताना कहाळा येथील रहिवासी असलेला आरोपी शेख करीम मोदीन उर्फ निसार हुस्सेन हा आयपीएल मॅचवर जुगार खेळताना ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या पोलीस टीमला आढळून आला. आरोपीकडून एक लॅपटॉप, तीन मोबाईल किंमत 55 हजार रुपये व नगदी 12 हजार रुपये मिळून आल्याचे कुंटूर पोलिसांनी सांगितले आहे.

सदरच्या कारवाई प्रकरणी फौजदार फिर्यादी दिनेश येवले यांच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करून नोटीस देऊन सोडण्यात आल्याचे समजते. सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संजय अटकोरे हे पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.