जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-संजय देशमुख लहानकर

469

अर्धापूर, नांदेड –

 

तालुक्यातील सर्व जनतेने जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्या दि.२२ शुक्रवारी रोजी सायंकाळी ५ वा.केदार पिठाचे जगद्गुरु श्री.श्री.श्री.१००८ भीमाशंकरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या शुभहस्ते व पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या कार्यक्रमास अर्धापूर तालुक्यातील कार्यकर्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर यांनी केले आहे.

अर्धापूर तालुक्यातील जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर पुतळा लोकार्पण सोहळ्याची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी स्थायी समिती सभापती किशोर स्वामी,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर,काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे, माजी सभापती संजय बेळगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजीराव गव्हाणे पाटील, तालुकाध्यक्ष बालाजीराव पांडागळे, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, शहराध्यक्ष राजेश्वर शेटे, डॉ.विशाल लंगडे, सोनाजी सरोदे, व्यंकटी राऊत, पंडितराव लंगडे आदी मान्यवरांच्या सत्कार शिवा संघटनेच्या वतीने करण्यात आला.

यावेळी स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी,काँगसेचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजीराव गव्हाणे यांचे भाषणे झाली. या बैठकीस सरपंच अमोल डोंगरे, बालाजीराव शेटे, विलास कापसे, ओमप्रकाश नागलमे, बेगाजी मरकुंदे, गोविंद गोदरे, महालिंग स्वामी महाराज, कुमार पत्रे, शिवराज लंगडे, मुन्ना शेटे, बुध्दाजीराव लंगडे, सारंग जडे, सटवाआप्पा सोनवणे, सचिन बुटले, कैलास भुस्से, हिरामण लंगडे, गोपाल लंगडे उपस्थित होते. या बैठकीचे प्रास्ताविक राजेश्वर शेटे, सुत्रसंचलन निळकंठ मदने तर आभार नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.