कै.लक्ष्मणराव मादसवार अनंतात विलीन;अंत्यविधीस लोटला हजारोंचा जनसमुदाय 

आ.माधवराव पाटील जवळगावकर व पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांची निवासस्थानी सांत्वनपर भेट

750

हिमायतनगर, नांदेड –

नांदेड न्यूज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार यांचे वडील कै.लक्ष्मणराव नरहरी मादसवार यांचे बुधवार दि.23 रोजी दुपारी 3 वाजता वयाच्या 87 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी दुपारी 12 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तेलंगणा, मराठवाडा, विदर्भातून मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित झाला होता.

कै.लक्ष्मणराव मादसवार यांच बुधवारी वृध्दापकाळान निधन झाल्यानंतर गुरूवारी वैकुंठधाम स्मशानभुमीत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.यावेळी पौर्वाहित्य कांतागुरू वाळके यांच्या उपस्थितीत यथासांग मंत्रोच्चारात मुलगा अनिल मादसवार यांनी चितेला भडाग्नी दिला.दरम्यान, मान्यवरांनी श्रध्दांजली वाहून लक्ष्मणराव मादसवार यांच्या जीवन कार्याची जडणघडण व्यक्त केली.

अंत्यविधीसाठी हभप माधव महाराज बोरगडीकर, परमेश्वर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, माजी खा.सुभाषराव वानखेडे, माजी आमदार नागेश पाटील, भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रसाद डोंगरगावकर, माजी सभापती गजानन तुप्तेवार, भाजपा तालुकाध्यक्ष आशिष सकवान, शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ ठाकरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर, डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डी.डी.गायकवाड, किसान सेना अध्यक्ष प्रकाश जाधव, प्रतिष्ठित व्यापारी गौतम पिंचा, गणराज ग्रुपचे मालक गणराज सादुलवार, विठ्ठल ठाकरे, संतोष गाजेवार, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी,

दासरी मालादासरी समाज संघटना अध्यक्ष मुरहारी दमन्ना यंगलवार, सचिव बालाजी सादुलवार, नाजीमचे संचालक गणेशराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान, माजी नगरसेवक प्रभाकरअण्णा मुधोळकर, अन्वर खान, सदाशिव सातव, ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी, मराठा साम्राज्य संघटनेचे मुन्ना शिंदे, लक्ष्मण डांगे, शाहीर रामराव वानखेडे, शाहीर मारोती सिलेवाड, राजू पाटील शेलोडेकर, अरविंद पाटील सिरपल्लीकर, संजय काईतवाड, संतोष फुलवाड, अ.खय्यूम अ.करीम, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दत्ता शिराणे, प्रकाश जैन, अशोक अंनगुलवार, गंगाधर वाघमारे, उत्तम बाभळे, गंगाधर पडोळे, लक्ष्मणराव मादसवार यांचे जावई – खासदार हेमंत पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी गोविंद गोडसेलवार, यांच्यासह तेलंगणा, विदर्भ, मराठवाडा परिसरातील नातेवाईक, मित्रमंडळी, डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापक, भोकर, हिमायतनगर, व जिल्ह्यातील पत्रकार बांधव, पोलीस अधिकारी, कर्मचारी, राजकीय, व्यापारी, सामाजिक क्षेत्रातील नागरिक व शहरवासीय हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

आ.जवळगावकरांकडून मादसवार कुटुंबियांचे सांत्वन

नांदेड न्यूज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार यांचे वडील, नांदेड 24 न्यूजचे संपादक गोविंद गोडसेलवार यांचे सासरे, पब्लिक वाईबचे तालुका प्रतिनिधी उत्कर्ष मादसवार यांचे आजोबा याचं निधन झाल्याची वार्ता समजताच आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांच सांत्वन केले. यावेळी त्यांच्या सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शेख रफिकभाई, शहराध्यक्ष संजय माने, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, सुरज दासेवार, ज्ञानेश्वर शिंदे, अ. बाकी सेठ, योगेश चिलकावार, यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष गोवर्धन बियाणी यांची मादसवार यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट

नांदेड न्युज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार यांचे वडील कै.लक्ष्मण नरहरी मादसवार यांचे बुधवारी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर गुरूवारी अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांच्या निधनाचे वृत कळताच नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष गोवर्धन बियाणी यांनी शनिवारी अनिल मादसवार यांच्या निवासस्थानी हिमायतनगर येथे भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी प्रजावाणीचे पत्रकार रविंद्र संगनवार, प्रजावणीचे भोकर प्रतिनिधी मनोजसिंह चव्हाण, पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता शिराणे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जैन, गोविंद गोडसेलवार, दिलीप शिंदे, अनिल नाईक, शुद्धोधन हानवते, सुनील दमकोंडवार आदींसह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.