शिवसेना सचिव खा.अनिल देसाई यांच्या उपस्थितीत शिवसंपर्क अभियानाची सुरुवात – बबनराव बारसे
अर्धापुरात आज जाहीर सभा, मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे आवाहन
अर्धापूर, नांदेड –
शिवसंपर्क अभियान अंतर्गत शिवसेना सचिव खा. अनिल देसाई यांच्या सभेला आज दि.२३ मार्च बुधवार रोजी सायंकाळी ६ वा.तलाब मैदान अर्धापूर येथे भोकर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक तसेच जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे यांनी केले आहे.
भोकर विधानसभा मतदारसंघात शिवसंपर्क अभियानाची सुरुवात शिवसेना सचिव खा.अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, खा.हेमंत पाटील, आ.बालाजी कल्याणकर, आ.संतोष बांगर, माजी आ.नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर, दत्ता कोकाटे, उमेश मुंडे आदींची उपस्थिती असणार आहे.
आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसंपर्क अभियानांतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सरकारने शेतकरी, कष्टकरी, कामगार, सर्वसामान्य नागरिकांना न्याय-हक्क व शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याच्या उद्देश तसेच शिवसेना बळकट करण्यासाठी पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत असून शिवसेना संघटनात्मक बांधणीसाठी व आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसंपर्क अभियान भोकर मतदारसंघात राबविण्यात येणार आहे.
शिवसंपर्क अभियान अंतर्गत जाहीर सभेला भोकर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थितीत रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे, उपजिल्हा प्रमुख दत्ता पाटील, तालुका प्रमुख संतोष कपाटे, माजी जि.प. उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर, उपसभापती अशोक कपाटे, उपजिल्हा प्रमुख बालाजी कल्याणकर, तालुका प्रमुख अमोल पवार, तालुका प्रमुख संजय कुरे, शहरप्रमुख सचिन येवले, उपतालुका प्रमुख सदाशिव इंगळे, उपतालुका प्रमुख कैलास कल्याणकर, उपतालुका प्रमुख संतोष कदम यांनी केले आहे.