विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उद्या शनिवारी अर्धापुरात

898

अर्धापूर, नांदेड-

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे दि.2 मार्च शनिवार रोजी रात्री ९ वाजता अर्धापूरात आगमन होणार असून शहरातील बसस्थानक परिसरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाच्या वतीने देण्यात आली आहे.

भाजपा नेते तथा महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस माजी खा.कै.गंगाधरराव कुंटूरकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमाला नायगावकडे नागपूरहून मोटारीने जात असल्याने अर्धापूरात जंगी स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या वतीने देण्यात आली आहे. या कार्यक्रमास अर्धापूर तालुक्यातील भाजपाच्या विविध आघाडी व मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, नगरपंचायत गटनेते बाबुराव लंगडे यांनी केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.